Nanded Photo 
मराठवाडा

Video: लॉकडाऊन : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची घ्यावी काळजी

शिवचरण वावळे

नांदेड : ‘कोरोना’ला हरविण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनला आज २५ दिवसांचा आवधी पूर्ण झाला आहे. तरी देखील कोरोनाचे भारतावरील संकट अजुन पूर्णपणे टळले नाही. त्यामुळे नाइलाजाने केंद्र शासनाला लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु करावा लागला. परंतु, या काळात केवळ घरात बसण्यासोबतच स्वतःच्या आणि परिवारातील ज्येष्ठांच्या अस्थिस्वास्थ्याकडेदेखील लक्ष द्यावे लागणार असल्याचे मत ग्लोबल हॉस्पीटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुशिल रंगदळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे. 

डॉ. रंगदळ यांच्या मते लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स, डायटेशियन आरोग्याविषयी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाययोजनांची माहिती देत आहेत. मात्र, यात अस्थिस्वास्थ हा विषय दुर्लक्षित राहिला असे त्यांना वाटतो. देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ‘लॉकडाऊन’च्या भीतीने घरात असलेल्या व वयाच्या साठीकडे झुकलेल्या व्यक्तींना कोरोना संक्रमाणाचा अधिक धोक्याची संभावणा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी तर घेतली पाहिजेच त्यासोबत त्यांचे जुनाट संधीवात, गुडघेदुखी, स्नायु आणि मनक्याचे आजार अशा विविध जुनाट व्याधी जडलेल्या असतात. त्या व्याधींनी ‘लॉकडाऊन’च्या काळात तोंड वर काढु नये यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे, असे डॉ. रंगदळ सांगतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा 
‘कोरोना’ विषाणू विरोधात लढताना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध, चवनप्राश, ताज्या पालेभाज्या, किमान आठ तास झोप, भरपूर पाणी पिणे अशा सूचना भारत सरकार आयुष मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून सांगितल्या जात आहेत.

शारिरीक व्यायामावर भर द्या  
ज्यांना पूर्वी संधीवाताचा किंवा स्नायुचा त्रास आहे. त्यांनी पूर्वीचे व्यायाम बंद न करता सुरुच ठेवावे, घराबाहेर जाऊन मॉर्निंग वॉक करणे शक्य नाही, त्यामुळे घराच्या छतावर, किंवा अंगणात तीन किलोमीटर चालण्याइतकी शतपावली करावी, किंवा अर्धातास योगासन व प्राणायाम करावा, एकदाच पोटभर न जेवता दिवसातून तीन ते चार वेळा जेवण करावे, आहारात प्रथिने व कॅल्शीयमची मात्रा असणाऱ्या पालेभाज्या, दूध, मास, अंडी, पालक, राजमा, नाचणी, चवळी, कडधान्य या सोबतच बटर, लोणी यांचा देखील समावेश असावा.  

सुर्यस्नानाला अनन्यसाधारण महत्व
हल्ली व्यायाम केला म्हणजे सर्व काही झाले असेच अनेकांना वाटते. मात्र व्यायाम, आहारासोबतच आठवड्यातुन किमान तीन वेळा तरी सुर्यप्रकाशाच्या सानिध्यात किमान अर्धातास घालवणे गरजेचे आहे. सकाळच्या या सुर्यस्नानामुळे हाडांना कॅल्शियम मिळते. त्यासाठी सकाळी सकाळी अर्धातास तरी सकाळच्या कोवळ्या उन्हात बसायला विसरु नका असा महत्वाचा सल्ला डॉ.सुशिल रंगदळ  यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT