file photo 
मराठवाडा

Video : भरधाव वेगाने आले अन् झाले क्वारंटाइन !

गणेश पांडे

परभणी : एका टेम्पो ट्रक्समध्ये बसून परभणी शहरातून वसमत (जि.हिंगोली) च्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या काही महिलांसह सात जणांना नवामोंढा पोलिसांना गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पकडले. ही सर्व माणसे कशासाठी जात होती याची माहिती पोलिस घेत असून सध्या या सर्वांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.

परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातून टॅम्पो ट्रक्स क्रमांक (एमएच २६ - बी २६५४) मध्ये काही माणसांना घेऊन सुसाट वेगाने शहर सोडत असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली होती. त्यांनी या टॅम्पो ट्रक्सची माहिती घेत असतांना हा टॅम्पोट्रक्स उड्डाण पुलावरून जात असल्याचे सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना दिली.

दोन्ही रस्ते करण्यात आले बंद 
 श्री. बगाटे त्या वेळी वसमत रस्त्यावर नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह हजर होते. हा टॅम्पोट्रक्स एकतर गंगाखेड किंवा वसमत रस्त्यावर येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले. परंतु, हा टॅम्पो गंगाखेड रस्त्याऐवजी उडाण पुलावरून सरळ वसमत रस्त्याने निघाला. त्यामुळे श्री. बगाटे व श्री. तट यांनी वसमत रस्त्यावर पोलिसांची वाहने आडवी लावून रस्ता बंद केला. काही मिनिटांत हा टॅम्पो वसमत रस्त्यावर आला. यात काही महिला, मुले व पुरुष होते. परंतु, त्यांनी पोलिसांना कोणतेही स्पष्ट कारण दिले नसल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. शहरात संचारबंदी लागू असतानाही हा टॅम्पोट्रक्स कॉलनीच्या बाहेर निघालाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सात जणांना केले क्वारंटाइन
या टेम्पोट्रक्समधून जाणाऱ्या या सात जणांना पोलिसांच्या संरक्षणात एका रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची तापसणी करून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

४६ जणांविरूध्दगुन्हा
बोरी (जि.परभणी) ः
संचारबंदी, जिल्हाबंदी व लॉकडाउनचे उल्लंघन करून महिलेच्या अंतिम संस्कारा करिता एकत्र येणाऱ्या ४६ जणांवर बोरी (ता.जिंतूर) च्या पोलिस प्रशासनाकडून बुधवारी (ता.२२) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
बोरीच्या ग्रामीण रुग्णालयासमोरील भागात अंतिम संस्कारा करिता मुंबई व इतर शहरातून नागरिक आल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक सुभाषचन्द्र मारकड यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने बाहेरून आलेल्या नागरिकांना ताब्यात घेतले. आरोग्य विभागाने ३१ जणांना क्वारंटाईन केले असून परभणी, बोरी व अकोली येथे त्यांना ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सदर प्रकरणात विविध कलमानुसार ४६ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
संचारबंदी व लॉकडाउन असतानाही छुप्या मार्गाने पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर कठोर कार्यवाही करून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, विवेकानंद पाटील व पंडित शिरसे यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

Gujarat Riots 2002 : गुजरात दंगलीतील तीन आरोपींची २३ वर्षांनी निर्दोष मुक्तता; अनेक साक्षीदारांचा मृत्यू , पुरावे गायब, तपास अधिकारीही...

धक्कादायक घटना! 'कुळकजाईत एकाचा खून'; मृतदेह शेतात नग्नावस्थेत, माण तालुक्यात उडाली खळबळ; नेमकं काय घडलं..

पोलिस भरतीत एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत; पहिल्यांदा मैदानी‌ नंतर एकाचवेळी लेखी परीक्षा; परीक्षेबद्दल वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT