मराठवाडा

video-सारंगस्‍वामी महाराज यात्रेत दीडशे क्‍विंटल प्रसादाचे वाटप

सय्यद मुजाहेद

शिरडशहापूर (जि. हिंगोली) ः औंढा नागनाथ तालुक्‍यातील शिरडशहापूर येथून जवळच असलेल्‍या सारंगवाडी येथे सुरू असलेल्‍या सारंगस्‍वामी महाराज यात्रेत शुक्रवारी (ता. १७) भाजी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या वेळी दीडशे क्‍विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला होता. राज्याभरासह कर्नाटक राज्यातील वीरशैव समाजबांधव भाजीचा प्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते.


औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूरपासून जवळच असलेल्‍या माळरानावर सारंगवाडी येथे विरशैव समाजबांधवांचे आराध्य दैवत असलेल्या सारंगस्‍वामी महाराज यांची यात्रा सुरू आहे. या यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. मकरसंक्रांतीनंतर तिसऱ्या दिवशी सारंगस्‍वामी महाराज यात्रेनिमित्त भाजीचा प्रसाद वाटप करण्यात येतो.

हेही वाचा... VIDEO-मूर्तिकलाच बनली उपजीविकेचे साधन
विविध भाज्यांचा बनविला महाप्रसाद

गुरुवारी (ता. १६) शिरडशहापूरसह परिसरातील भाविकांनी मेथी, पालक, टोमॅटो, काकडी, कदू, चवळी, आवरा, कांद्याची पात, कोबी, हरभरा, करडई, गाजर, सिमला मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची, शेपू, वांगे, बटाटे, वाटाणा आदी प्रकाराच्या भाज्या आणून दिल्या. शुक्रवारी (ता. १७) सकाळी साडेसात वाजता एका मोठ्या कढईत मंदिर परिसरात या सर्व भाज्या एकत्र करून शिजविण्यात आल्‍या. त्‍यानंतर साडेनऊ वाजता जिल्‍हा परिषद सदस्य श्रीशैल्य स्‍वामी, उज्‍ज्वलाताई तांबाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्‍थितीत भाजी महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. यात हजारो भाविकांनी रांगा लावून भाजी प्रसादाचा लाभ घेतला. उज्‍ज्वलाताई तांबाळे यांच्यातर्फे भाविकांना पोळ्यांचे वाटप करण्यात आले.

परराज्यांतून भाविक दाखल

या कार्यक्रमासाठी राज्‍याभरासह कनार्टक आदी राज्यांतून भाविक दाखल झाले होते. येथे सकाळपासूनच भाविक दाखल होत असल्याने परिसरात वर्दळ वाढली होती. यात्रा परिसरात हजारो वाहने लावण्यात आली होती. दरम्यान, पोलिस व महसूल प्रशासनातर्फे चोख बंदोबस्‍त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वीरशैव समाजबांधवांसह शिरड शहापूर, सारंगवाडी, गवलेवाडी येथील गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.

हेही वाचा...Video - हजारो भाविकांनी घेतला भाजी-भाकरीचा प्रसाद ​

यात्रेनिमित्त विविध साहित्य विक्रीची दुकाने

सारंगवाडी येथे वीरशैव समाजबांधवांचे आराध्य दैवत असलेल्या सारंगस्‍वामी महाराज यांची यात्रा सुरू आहे. नवीन वर्षातील पहिल्या सणानंतर तिसऱ्याच दिवशी ही यात्रा येते. यात विविध व्यापारी मोठ्या संख्येने साहित्य विक्रीसाठी घेऊन येतात. गुरुवारपासूनच व्यापारी दाखल होत होते. मंदिर परिसरात विभुती, पोथ्या, पुजेचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने, भांड्यांची दुकाने, हॉटेल आदी दुकाने थाटण्यात आली होती.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway In Maharashtra : साताऱ्याच्या दुष्काळी मातीला येणार सोन्याचे दिवस! 'या' 3 तालुक्यांचा चेहरामोहरा बदलणार; जाणून घ्या काय आहे मेगा प्लॅन?

Government Job: SSC CGL 2026 नोटिफिकेशन जारी! 12,256 जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या परीक्षा तारखा ते अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात दऱ्याचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा

Daund Manmad Railway: दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाचा फटका; सोलापूर विभागातील गाड्या तासन्तास उशिराने, सोलापूर विभागातील रेल्वे वेळापत्रक कोलमडले

Raigad: रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार, प्रशासनाचा मोठा निर्णय, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT