आयुक्त डॉ. सुनिल लहाने  
मराठवाडा

Video - नांदेडचे आयुक्त काय म्हणाले ते पहा...

अभय कुळकजाईकर

नांदेड - शहर आणि जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. लॉकडाउन ता. तीन मे पर्यंत असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सेवा सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू राहतील. त्यामुळे नियमांचे पालन करण्याच्या सूचना नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिल्या आहेत. 

महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी मंगळवारी (ता. २१) शहरातील नवा मोंढा, वजिराबाद, जुना मोंढा, यात्री निवास आदी भागांना भेटी देऊन पाहणी केली तसेच महापालिकेने केलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत उपायुक्त अजितपालसिंघ संधू होते

दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नांदेड शहरात रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार नांदेड शहरातील शासकीय, निमशासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारी आस्थापना व त्यांच्याशी निगडीत दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने हे केवळ सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू राहतील. त्यामुळे त्याचे पालन करावे तसेच नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. लहाने यांनी केले आहे. 

आयुक्तांनी केली पाहणी
दरम्यान, आयुक्त डॉ. लहाने यांनी नवा मोंढा भागात कृषि उत्पन्न बाजार समिती भागात भेट देऊन पाहणी केली. काही व्यापारी आणि कामगारांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजाऊन घेतल्या. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, तोंडाला मास्क लावा अशा सूचनाही केल्या. त्याचबरोबर जुना मोंढा येथे देखील त्यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी, हमाल, गाडीचालक आदींची भेट घेऊन चर्चा केली. नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून काही खासगी दुकाने व आस्थापना चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. शासनाने केलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन व्यवहार सुरु ठेवा, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मास्क नसेल तर दंड होईल, अशाही सूचना केल्या. 

एनआरआय यात्री निवासला भेट 
नांदेड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनाचा आढावा त्यांनी घेतला. तसेच इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून ज्या व्यक्ती आल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंनटाइन करण्यात आले आहे. त्यापैकी एक असलेल्या एनआरआय यात्री निवास येथेही आयुक्त डॉ. लहाने यांनी भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींना नियमित सोयी सुविधा मिळत आहेत का? त्यांना काही अडचणी आहेत का? या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT