फोटो
फोटो 
मराठवाडा

(व्हिडीओ)- चक्क... अशोक चव्हाणांनी काढले होर्डींग्ज 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड शहर महानगर पालिका क्षेत्रात नको तिथे आपल्या नेत्यांच्या, महापुरुषांच्या जयंत्या तसेच खासगी शिकवणीचालकांनी प्रसिध्दीसाठी होर्डींग्ज लावले. यामुळे स्वच्छ व सुंदर नांदेड संकल्पनेला गालबोट लागून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ही बाब चक्क शनिवारी (ता. १८) राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विश्रामगृहाकडे जात असतांना त्यांनी आपला ताफा थांबविला. आयटीआय परिसरात ते स्वत: गाडीच्या खाली उतरून अनधीकृतपणे लावलेले होर्डींग्ज काढले. त्यात त्यांच्याही आगमणाचे होर्जींग्ज होते. त्यानंतर विश्रामगृहावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात आले.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरात महापालिकेला होर्डींग्ज लावण्यासाठी काही   ठरावीक जागा दिल्या होत्या. त्या ठिकाणी महापालिकेची परवानगी घेऊन होर्डींग्ज लावावे अशा सुचना दिल्या होत्या. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर शहरात मागील काही दिवसांपासून अलबेल सुरू झाले. राजकिय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजीक चळवळीचे पदाधिकारी, खासगी शिकवणी चालकांनी शहरात उच्छाद मांडला आहे. 

अशोक चव्हाण एक्शन मुडमध्ये

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण शनिवारी (ता. १८) सकाळीच ऍक्शन मूडमध्ये अवतरले. सकाळी त्यांचा ताफा घरातून निघताच रोडवर त्यांना काँग्रेससह विविध जाहीरातीचे अनधिकृत बॅनर दिसले. नामदार चव्हाण यांनी लगेच आपला ताफा थांबवून ते बॅनर तिथून काढून टाकले. नांदेड शहरात यापुढे अनधिकृत बॅनर लावू देणार नसल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झालय. त्यामुळे श्री. चव्हाण यांनी आज स्वतः पासून सुरुवात करत आपल्याच पक्षाचे बॅनर हटवले आहे. कुणीही अनाधिकृत बॅनर लाऊ नये असं आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.

येथे क्लिक करा - विमा कंपनीवर गुन्हा, ओरिएंटलला मुदत - धनंजय मुंडे
 
नांदेड मनपात काँग्रेसची एकहाती सत्ता

दरम्यान, नांदेड मनपात काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. मात्र तरीही मनपा अकार्यक्षम बनल्याने शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बॅनर लावल्या जात असतात. या अनाधिकृत बॅनरमुळे शहरात अनेकदा अपघात देखील होत असतात. मात्र बॅनरवरून चमकोगिरी करणाऱ्या मंडळींना याचे काही देणे घेणे नसते. आज स्वतः चव्हाण यांनी या प्रकाराची दखल घेऊन स्वतःच्याच पक्षाचे बॅनर हटवलय. त्यानंतर झोपलेल्या मनपाला देखील जाग आली आणि मनपाची यंत्रणा कामाला लागलीय. शहरातील अनाधिकृत बॅनर हटवण्यासाठी मनपाचे कर्मचारी कामाला लागल्याचे चित्र दिसते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT