Anand Nilawar
Anand Nilawar 
मराठवाडा

व्हिडिओ: लघू, शेतीवर आधारित उद्योग सुरू व्हावेत: आनंद निलावार

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. जिल्‍ह्यात एकमेव पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्‍त केले आहे. आता हळूहळू प्रशासानाने लघू व शेतीवर आधारित उद्योग सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र फर्टीलायझर संघटनेचे प्रदेश सहसचिव तथा जिल्‍हाध्यक्ष आनंद निलावार यांनी केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्व यंत्रणा कामाला लागली होती. तसेच आरोग्य विभाग देखील सतर्क झाला होता. सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करत रुग्णावर उपचार सुरू ठेवले होते. 

स्‍वॅब नमुना तपासणीनंतर निगेटीव्ह

त्‍याला जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी व त्‍यांच्या सहकाऱ्यांनी देखील मदत केली. यामुळे जिल्‍ह्यात कोरोना आजार रोखण्यात यश आले आहे. जिल्‍ह्यात एकमेव कोरोनाचा पॉझीटिव्ह रुग्ण असल्याने आपला जिल्‍हा ऑरेज झोनमध्ये गेला होता. मात्र रुग्णाचा १४ दिवसाचा कालावधी संपल्यानंतर त्‍याचा स्‍वॅब नमुना तपासणीनंतर निगेटीव्ह झाला आहे.

शेतीच्या कामाचे दिवस

 यामुळे लवकरच आपला जिल्‍हा देखील शासनाने जाहीर केलेल्या झोनच्या यादीत ग्रिनमध्ये जाणार आहे. दरम्‍यान, मागच्या २१ दिवसांपासून संयम पाळून लॉकडाउनला सर्वांनी साथ दिली आहे. परंतु, आता शेतीच्या कामाचे दिवस आल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवा जमव करणे गरजेचे आहे.

शेती साहित्य खरेदीसाठी सुट देणे गरजेचे 

 त्‍यासाठी हळूहळू लॉकडाउनमध्ये शिथिलता देत शेती व्यवसायाला प्राधान्य दिले पाहीजे. जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती आहे. त्‍यावरच सर्व व्यवसायाचे गणिते अवलंबवून आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेती साहित्य खरेदीसाठी सुट देणे गरजेचे आहे. 

उद्योग सुरू करावेत 

जिल्‍ह्यात खताचा अंत्यत तोकडा पुरवठा आहे. त्‍यासाठी पुरवठ्याची साखळी पूर्ण करणे गरजचे आहे. शेती व लघु उद्योजकांचे उद्योग सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्‍हा प्रशासानाने काही अटी घालुन हे उद्योग सुरू करावेत अशी अपेक्षा उद्योजन आनंद निलावार यांनी व्यक्त केली आहे. 

जिल्हा कोरोनामुक्त 

जिल्ह्यात एकमेव असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे यंत्रणांनीसुटकेचा नि:श्वास सोडला असलातरी आणखी काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. शेजारच्या परभणीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे पालन करणे महत्वाचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Latest Marathi News Live Update: शिवाजी पार्कमध्ये मोदींचे कटआऊट हटवले, भाजप कार्यकर्ते संतप्त

SCROLL FOR NEXT