File photo 
मराठवाडा

Vdeo : -  इतर राज्यात अडकलेल्यांनी तिथेच रहावे...कोण म्हणाले वाचा...

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला. त्याचबरोबर जिथे आहात तिथेच रहा आणि काळजी घ्या, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासह इतर विभागातील प्रमुख अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये, आपआपल्या घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिथे आहात तिथेच रहा

गेल्या चार दिवसापासून पालकमंत्री चव्हाण नांदेडमध्ये असून वेगवेगळ्या उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन तसेच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासोबत संपर्क करुन आढावा घेत आहेत. नांदेडचे शहर व जिल्ह्यातील काही नागरिक इतर राज्यात अडकले आहेत. त्याबाबत मला दररोज सात ते आठ फोन येत आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी तूर्त जिथे आहेत, तिथेच रहावे. कारण विमान, रेल्वे तसेच बस वाहतूक बंद आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली आहे.

संपर्कात रहा...

नांदेडचे नागरिक ज्या राज्यात अडकून आहेत. त्यांनी तूर्त तिथेच रहावे. कारण त्यांना नांदेडला आणण्यासाठी वाहनांची देखील सोय होऊ शकत नाही. कारण वाहनांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. त्यामुळे एवढ्या लांबून लगेचच आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे जिथे आहेत तिथेच सुरक्षित रहावे. आम्ही सर्वजण आपल्या संपर्कात राहू, आपआपली काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

फळे, भाजीपालासाठी सूट

फळे, भाजीपाला, दूध, गोळ्या, औषधे आदी अत्यावश्‍यक सेवा आहेत. त्यामुळे त्यांच्या वाहनांसाठी सूट देण्यात येत आहे. त्यावर निर्बंध घालू नयेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिली. त्याचबरोबर आरोग्य व इतर तातडीच्या सेवांसाठी काही नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. त्यांची देखील काळजी पोलिस विभागाने घ्यावी. त्यासाठी संबंधित तहसीलदार व पोलिस ठाणे प्रमुखांनी एकत्र येऊन नियोजन करावे. दररोज नवनवीन निर्णय परिस्थितीनुसार घ्यावे लागत आहेत. तातडीची सेवा देण्यासाठी म्हणून बारा विभाग आणि त्यासाठी बारा अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री या नात्याने मी तसेच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक मिळून परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे आणि आपआपल्या घरी रहावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT