Nanded-Loksabha
Nanded-Loksabha 
मराठवाडा

Vidhansabha 2019 : काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान

अभय कुळकजाईकर

नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी चालवली आहे. मागील वेळी प्रत्येकजण स्वबळावर लढले. यंदा मात्र युती आणि आघाडी होण्याबरोबरच, वंचित बहुजन आघाडी उतरण्याच्या शक्‍यतेने राजकीय गणिते बदलणार आहेत. 

नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मागील वेळी सहापैकी नांदेड उत्तर (डी. पी. सावंत), भोकर (अमिता चव्हाण) आणि नायगाव (वसंत चव्हाण) काँग्रेसकडे; तर नांदेड दक्षिण (हेमंत पाटील) आणि देगलूरची (सुभाष साबणे) जागा शिवसेना आणि मुखेडची (डॉ. तुषार राठोड) जागा भाजपला मिळाली होती. 

नांदेड जिल्ह्यावर अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. तरीही मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने जोरदार टक्कर दिली होती. आताच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपसोबतच वंचित बहुजन आघाडीनेही जोरदार प्रचार केला. 

नांदेड उत्तरमधून तिसऱ्यांदा काँग्रेसकडून आमदार डी. पी. सावंत रिंगणात राहण्याची शक्‍यता आहे. त्यांच्या विरोधात भाजपकडून मिलिंद देशमुख, सुधाकर पांढरे, डॉ. मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड आदींची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते कमलकिशोर कदम, महानगराध्यक्ष डॉ. सुनील कदम यांचीही भूमिका महत्त्वाची राहील. 

नांदेड दक्षिणमधील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीतून लोकसभा लढवली आहे. त्यामुळे त्या निकालानंतर शिवसेनेचा निर्णय होईल. भाजपकडून दिलीप कंदकुर्ते, महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, काँग्रेसकडून अजून उमेदवाराची चर्चा झाली नसली तरी अब्दुल सत्तार, शमीम अब्दुल्ला, नरेंद्र चव्हाण, उपमहापौर विनय गिरडे आदींच्या नावाची चर्चा आहे. नांदेड उत्तर आणि दक्षिणसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही.  

भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केलंय. सध्या अमिता चव्हाण आमदार आहेत. विरोधात भाजपचे डॉ. माधव किन्हाळकर यांचेच नाव तूर्त तरी आहे.

नायगावमध्ये पुन्हा काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांना संधी मिळू शकते. मात्र, येथे आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांची भूमिका महत्त्वाची आहे. भाजपकडून राजेश पवार मुख्य दावेदार आहेत. भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर आणि भास्करराव पाटील खतगावकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. 

देगलूरमधून शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी मिळेल. या ठिकाणी भाजप तसेच राष्ट्रवादीची भूमिकाही निर्णायक आहे. मुखेड मतदारसंघातून भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांना पुन्हा उमेदवारीची शक्‍यता असली, तरी त्यांचे बंधू गंगाधर राठोड तसेच इतरांच्या नावाचीही चर्चा आहे. विरोधात काँग्रेसचे माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या नावासह त्यांचे बंधू दिलीप पाटील बेटमोगरेकर आणि ज्येष्ठ नेते शेषराव चव्हाण यांच्याही नावाची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT