Bycott Voting
Bycott Voting 
मराठवाडा

मुलभुत गरजा सोडून अनोख्या कारणासाठी गावाचा मतदानावर बहिष्कार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

कन्नड (औरंगाबाद) - गावात रस्ता नाही, पाणी नाही, शाळा नाही. अशा अनेक पायाभूत सुविधासाठी निवडणूक आली की गावकरी मतदानावर बहिष्कार टाकताना आपण पाहिलं आहे. मात्र गावात मोबाईल टॉवर नाही औरंगाबाद जिल्ह्यातल्या कळंकी या गावाने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. पायाभूत सुविधा सोडून मोबाईलसाठी या गावाने बहिष्कार घातला आहे.

कन्नड तालुक्यातील कळंकी गाव हे गाव डोंगराळ भागात आहे. या गावात रस्त्याची, पिण्याच्या पाण्याची, शाळेची समस्या आहे. आता या समस्या म्हणजे फार काही वेगळे नाही सगळ्याच गावांच्या सारख्याच समस्या असं गावकरी म्हणतात. मात्र या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गावात एक मोठी आणि वेगळी समस्या आहे ही समस्या म्हणजे गावात असलेलं मोबाईल टावर चालत नाही. 

वर्षभरापूर्वी गावात हे मोबाईल टावर लावण्यात आले. मोबाईल टावर सुरू नाही,आणि त्यामुळे गावकऱ्यांचे फोन असून-नसून काही फायदाच नाही. जर फोनवर बोलायचं असेल तर एक तर घराच्या छतावर जावं लागतं, नाहीतर गावाच्या बाहेर, नाहीतर थेट शेतात. त्यामुळे लोक पुरते वैतागले आहेत.

विकास झाला म्हणताय मात्र साधा फोनही लागत नाही तर हा कसला विकास असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. आता याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदनही दिली मात्र मोबाइल टॉवर काही सुरू झालं नाही. अखेर आता यावेळी विधानसभा निवडणुकीत मतदानच करणार नाही असा पवित्रा गावाने घेतला आहे. मोबाईल लागत नाही म्हणून माहेरी बोलता येत नाही म्हणून महिलाही जाम वैतागल्या आहेत.

 

महिलांचे सोडा गावातले वृद्ध आणि तरुणही या मोबाईल बंदीने वैतागले आहेत, कोणी मेलं तर चार-चार दिवस माहिती मिळत नाही असं गावातील वृद्ध सांगतात. तर तरुणांची वेगळी समस्या त्यांना फेसबुक वापरता येत नाही, व्हाट्सअप चालत नाही. त्यामुळे रस्ते पाणी सोडा किमान मोबाईल टॉवर तरी सुरु करा असं त्यांचं म्हणणं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT