kagban.1.jpg 
मराठवाडा

ग्रामस्‍थांच्या पुढाकाराने बदलले गावचे रूपडे

शंकर राहटीकर

हयातनगर ः वसमत तालुक्‍यातील कागबन गावाने गावात स्‍वच्‍छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून दर रविवारी गावात स्‍वच्‍छता अभियान राबविले जात आहे. यात शालेय विद्यार्थी देखील सहभागी होत असून गाव चकाचक केले जात आहे. 

वसमत तालुक्‍यातील कागबन गावची लोकसंख्या अकराशे आहे. गावात बहुतांश शेतकरी व शेतीवर आधारित काम करणाऱ्या मजुरांची संख्या अधिक आहे. गावात पहिली ते पाचवीपर्यंतची जिल्‍हा परिषद शाळा आहे. त्‍यानंतर विद्यार्थ्यांना येथून जवळच असलेल्या हयातनगर येथील शाळेत पुढील शिक्षण घ्यावे लागते. यासह गावात महिला बचतगटाची स्‍थापना झाली असून नियमित त्‍याच्या बैठका घेवून बचत केली जात आहे. तसेच गटाने बँकेकडे कर्जासाठी मागणी केली असून गटातील महिला गटातील सदस्यांना देखील कर्जाचे वाटप करतात. यामुळे काही गट सक्षम देखील झालेले आहेत. 

यांनी घेतला पुढाकार
गावात स्‍वच्‍छता अभियान राबविण्याचा निर्णय ग्रामस्‍थांनी घेतला. त्‍यासाठी सरपंच सागरबाई कोल्हे, देवानंद ढवळे, सदाशिव महाजन, आशालता ढवळे,बबन कोल्हे,सुर्यभान ढवळे, अंकुश महाजन, रामभाऊ ढवळे,संजय ढवळे,निलावंती सवंडकर,सारिका महाजन, रेणुका ढेंबरे , तुळशीराम जाधव,प्रविण महाजन, शंकर ढवळे, साईनाथ ढवळे,गोंविद ढवळे,अमोल ढवळे,लक्ष्मण ढवळे,मुंजाजी कल्याणकर, निवृती सवंडकर यांनी पुढाकार घेवून घरोघरी जावून स्‍वच्‍छेतेचे महत्‍व पटवून दिले. त्‍यानंतर आठवड्यातून एक दिवस श्रमदान करण्याचा निर्णय झाला. यासाठी रविवारचा दिवस निवडण्यात आला. 

गावातील नाल्यांची देखील साफसफाई
बाहेर गावात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी सुट्टीच्या दिवसी या अभियानात सहभागी होत आहेत. शाळेचा परिसर, मंदिराचा परिसर, गावातील रस्‍ते साफ करून जमा झालेल्या कचऱ्याची विल्‍हेवाट लावली जात आहे. गावातील नाल्यांची देखील साफसफाई केली जात आहे. गांजरगवत निर्मुलन केले जात आहे. या उपक्रमामुळे गावात स्‍वच्‍छता झाली आहे. आरोग्याचा प्रश्न सुटण्यास देखील मदत झाली आहे. 

कचऱ्याचे ढिगारे दिसेनासे झाले
गावात वाढलेल्या डासांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. गावातून बाहेरगावी जाणारे विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी शाळेच्या परिसरात स्‍वच्‍छता करून येथे केलेल्या वृक्षांना पाणी देत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संगोपन केले जात आहे. गावात स्‍वच्‍छतेची चळवळ सुरू झाल्याने सार्वजनिक ठिकाणी आता कचऱ्याचे ढिगारे दिसेनासे झाले आहेत. 

प्रत्‍येक रविवारी गावात स्‍वच्‍छता
कागबन गावात स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी गावातील सर्वांनी संघटित होवून स्‍वच्‍छता अभियान सुरू केले आहे. प्रत्‍येक रविवारी गावात स्‍वच्‍छता केली जात आहे. यात शालेय विद्यार्थी देखील सहभागी होत असल्याने गाव चकाचक झाले आहे. -निवृती सवंडकर, ग्रामस्‍थ, स्‍वच्‍छता मोहीम प्रमुख.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT