Vishwanath 
मराठवाडा

गाव तस चांगल... कोरोनाच्या भीतीनं बाधलं...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः सतत दुष्काळाच्या सावटाखाली आणि सदा आर्थिक चिंतेने ग्रासलेल्या सर्व ग्रामीण भागातील गावे आता वेगळ्याच भीतीखाली वावरत आहेत. एरवी आहे त्या परिस्थितीला हसतमुखाने तोंड देत गावची वेगळी प्रतिमा जपण्याचे प्रयत्न करणारे गावकरी मात्र, ‘कोरोना’ नावाच्या आजाराने घाबरल्याचे दिसून येते. जगभरात थैमान घाललेल्या ‘कोरोना’ने भारतासह महाराष्ट्रातही मोर्चा वळविला आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी पाळत आपापल्या घरीच राहून काळजी घेण्याची गरज आहे. शासन यासाठी आत्मियतेने जनतेला घरून बाहेर न पडता काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, जिल्ह्यात काही जण याचे गांभीर्य न घेता बिनधोक रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत. 

सरकार आज अनेक माध्यमांद्वारे नागरिकांना घरी बसूनच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी (कलम- १४४) लागू केली आहे. मात्र, नागरिक या आवाहनाला न जुमानता रस्त्याने काही कारण नसतानाही फिरताना आढळून येत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसांकडून यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, नागरिक अजूनही मनावर घ्यायला तयार नाहीत. 

आता स्वतःने स्वतःला ओळखण्याची गरज

‘कोरोना’ हा आजार अतिशय भयंकर रोग आहे. यावर कोणताही उपाय निघालेला नाही. त्यामुळे आपणच स्वतः स्वतःला ओळखून काळजी घेण्यची गरज आहे. तसेच एकमेकांचा संपर्क टाळून देशासह संपूर्ण जगालाही या संकटातून वाचविण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की, आपण कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच असे कोणी करीत असल्यास त्यांना समजावून सांगून घरीच राहण्यासाठी मज्जाव करावा.

काही जण पोचले तपासणीविना बाहेर जिल्ह्यांतून

रेल्वे, बससेवा बंद केल्यामुळे काही पुण्या, मुंबईला राहणारे नागरिक खासगी वाहनांनी तसेच काही जण मोटारसायकलवरून प्रवास करून गावाकडे आले आहेत. अशांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात आली नाही. तसेच काहींचे कुटुंबीयही अशा घरवापसींची माहिती लपवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अशा पळवाटेने येणाऱ्यांनीही आपण स्वतःहून आरोग्य तपासणी करून घेऊन क्वारंटाइन करायला हवे. क्वारंटाइन केले म्हणजे आपणाला कोरोना झाला असे नव्हे, तर स्वतःसह आपल्या सहवासातील नागरिकांची सुरक्षितता म्हणून घ्यावयाची दक्षता होय. 

पोलिस पाटील घेताहेत गावाची दक्षता

बाहेरगावाहून आलेल्यांची ग्रामीण भागातही दक्षता घेतली जात आहे. मात्र, काही बाहेरून आलेले लोक त्यांच्याशी हुज्जत घालून क्वारंटाइन करून घेण्यास नकार देत असल्याचे निदर्शनास येत आहे. पण अशा घरवापसींनी आपली जबाबदारी म्हणून स्वतःहून या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून क्वारंटाइन करून घ्यावे. यामुळे कोरोना हा आजार गावापासून दूरच राहण्‍यास मदत होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT