file photo 
मराठवाडा

शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार

सकाळ वृत्तसेवा

परभणी : पारवा (ता. पालम, जि.परभणी) येथील रहिवाशी विश्वांबर बापूराव कराळे या शेतकऱ्याच्या मुलाने २०१७-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या फौजदार पदाच्या परीक्षेत यश मिळविले आहे.

पालम तालुक्यातील पारवा गावातील शेतकरी कुटुंबातील विश्वांबर कराळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत २०१८ या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. १७) जाहीर झाला. या पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या परीक्षेत राज्यात २४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. विश्वांबर कराळे याचे प्राथमिक शिक्षण पारवा (ता. पालम) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण शरद पवार हायस्कूल चितळी (ता. लोहा, जि. नांदेड) येथे, उच्च माध्यमिक शिक्षण यशवंत महाविद्यालय अहमदपूर (ता. अहमदपूर, जि. लातूर), उच्च शिक्षण पालम शहरातील माधवराव पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेतून उच्चशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने २०१६ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पुणे येथे जाऊन अभ्यास केला. 

प्रेरणादायी यश
कोणत्याही शिकवणीशिवाय स्व:त अभ्यास करून तयारी केली. जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे. रात्रंदिवस मेहनत करत त्याने यशाला गवसणी घातली. पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा त्याने २०१८ या वर्षी दिली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. १७) जाहीर झाला. यात त्याने उज्ज्वल यश संपादन केले. या यशामुळे ग्रामीण भागातील एका होतकरू शेतकऱ्याच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. भावी पिढीसाठी नक्कीच हे यश प्रेरणादायी अहसल्याचे त्याने दाखवून दिले आहे.


‘एनसीसी’च्या माध्यमातून प्रेरणा
वडिलांचा स्वभाव कडक शिस्तीचा, त्यामुळे इतर मित्रांसोबत वेळ न दडवता अभ्यास केला. शिवाय माधवराव पाटील महाविद्यालयात असताना ‘एनसीसी’च्या माध्यमातून जास्त प्रेरणा मिळाली. शिवाय भावाचे मार्गदर्शन आणि वडिलांची शिस्त या सर्वांमुळे मी या यशापर्यंत पोचलो. त्यामुळे माझ्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ यांना देतो.
- विश्वांबर कराळे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : ठाकरे गट १४ सप्टेंबर रोजी करणार आंदोलन, भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT