2Sakal_20News_11 
मराठवाडा

प्रत्येक मतदान केंद्रांवर जाऊन पाहणी करा, लातूर जिल्हाधिकाऱ्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना

हरि तुगावकर

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी ता.एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील ३८ हजार १९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या करीता ८८ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सोयी सुविधांबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन पाहणी करावी व त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जी.श्रीकांत यांनी दिल्या आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित औरंगाबाद पदवीधर मतदार संघ या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेच्या आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे उपस्थित होते.
प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग पदवीधर मतदार व ज्येष्ठ मतदारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात.

प्रत्येक मतदार केंद्रावर एक कोविड अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकाची नियुक्ती करावी. त्या मतदार केंद्रावर आरोग्यसेवकामार्फत कोविडच्या अनुषंगाने मतदानासाठी येणाऱ्या मतदाराचे
तापमान मोजणे, पल्स रेट चेक करणे आवश्यक असून आरोग्य सेवकांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडावी, असे जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांच्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रशिक्षण घेतले जावेत व प्रत्येक प्रशिक्षण झाल्यानंतर त्याबाबतची नमुना चाचणी घेण्यात यावी.

प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण अत्यंत दक्षपणे घ्यावे. निवडणूक काळात झालेली एक ही चूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. निवडणूक कामकाजासाठी निवडलेले अधिकारी हे काम करण्यास सक्षम आहेत का याबाबत ही सर्व नोडल अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी यांनी खात्री करावी व गरज असेल त्या ठिकाणचे अधिकारी बदलून त्याऐवजी दुसरे अधिकारी नियुक्त करावेत, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. पोलिस बंदोबस्त अहवाल दोन दिवसांत सादर करावा अशी सूचना त्यांनी केली.



संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT