Hingoli News
Hingoli News 
मराठवाडा

GRAMPANCHAYAT ELECTION : हिंगोली जिल्ह्यात कारभारी निवडीसाठी मतदानाला सुरुवात

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात एकुण ४९५ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असुन यापैकी ७३ ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याने आता ४२२ ग्रामपंचायतचे कारभारी निवडीसाठी शुक्रवारी (ता.१५)  सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली.

जिल्ह्यात एक हजार २७२ बुथवर सहा लाख ६० हजार ७११ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान केंद्रावर हळूहळू मतदारांची गर्दी होत आहे. गावात जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी उमेदवारांसह त्यांचे समर्थक मतदारांना मतदान करण्यास आवाहन करत गल्लोगल्ली मतदानाला चला आवरा लवकर मतदान करुन नंतर घरची कामे करा असे सांगत आहेत. 

कामानिमित्त बाहेरगावी गेलेले गावकरी देखील मतदानासाठी गावात दाखल झाल्याने गावे गजबजली आहेत. मतदारांना वाहनांतुन मतदान केंद्रापर्यंत आणले जात आहे. मतदान केंद्रावर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  अनेक गावात दुरंगी, तिरंगी लढत होत असल्याने आपल्या प्रभागात जास्तीत जास्त मतदान करून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. मतदान केंद्राबाहेर टेन्ट टाकून उमेदवार व त्यांचे समर्थक बसले आहेत. मतदानासाठी आलेल्या मतदारांना पोल चिट वरुन त्यांचा बुथनंबर यादी नंबर लिहून देत आहेत. 

शेतात कामासाठी जाणारे शेतकरी, मजूर यांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिल्याने अनेकांनी मतदान करून आपल्या कामाच्या ठिकाणी गेले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात शुक्रवारी असलेले आठवडी बाजार मतदानामुळे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्याने आज आठवडी बाजार बंद होते. जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

SCROLL FOR NEXT