Majalgaon Dharan 
मराठवाडा

माजलगाव धरणातून पुन्हा विसर्ग सुरू, अकरा दरवाजांमधून पाणी सोडले

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर बरसलेल्या परतीच्या पावसामुळे व धरण कार्यक्षेत्रातही जोरदार हजेरी लावल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी धरणातून सिंदफणेत अकरा दरवाजांमधून २२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोमवारी (ता.१२) पहाटे सोडण्यात आले. जून महिन्याच्या सुरवातीपासूनच या वर्षी वरूणराजाने दमदार हजेरी लावत जोरदार बॅटींग केलेली आहे.

त्यामुळे जुन महिन्यांपासूनच धरण भरण्यास सुरवात झाली. दरम्यान जुलै महिन्याचे काही दिवस कोरडे गेल्याने जायकवाडी धरणातुन कालव्याद्वारे माजलगाव धरणात पाणी आले होते. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढला होता आणि त्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात व परिसरात बरसलेल्या पावसामुळे माजलगाव धरण १६ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले. त्यामुळे धरणातून सिंदफणा नदीपात्रात जवळपास २३२ दशलश घनमीटर पाणी सोडण्यात आले.

मागील दहा दिवसांपासून गायब असलेल्या वरूणराजाने शनिवारीपासून (ता.दहा) बरसत असल्यामुळे धरणात मोठी पाण्याची आवक झाली. त्यामुळे सोमवारी पहाटे धरणातून अकरा दरवाज्यातुन २२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीत करण्यात आला आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Dussehra: दसऱ्याच्या दिवशी सोनं 33 हजारांनी स्वस्त! 75 दिवसांतील सर्वात कमी भाव; आज 10 ग्रॅम कितीला? सर्वात स्वस्त कुठे?

ड्युटीवर गैरहजर, वादग्रस्त मालमत्तांची खरेदी; तक्रारीनंतर हेड कॉन्स्टेबलच्या निवासस्थानी छापा, सापडली कोट्यवधींची माया

PM Kisan 24th Installment Date 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा 24 वा हप्ता अडकणार? त्याआधी पटापट करून घ्या 'ही' 3 कामे, नाहीतर नाव होणार कट?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांच्या ३ मोठ्या घोषणा; बीडच्या दसरा मेळाव्यातून सरकारवर पुन्हा दबाव!

Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्कमाफीसाठी विद्यापीठाची प्रक्रिया वेगात

SCROLL FOR NEXT