मुळी (ता. गंगाखेड) बंधारा संग्रहित छायाचित्र  
मराठवाडा

‘या’ शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटणार!

गणेश पांडे

परभणी : मुळी (ता. गंगाखेड) बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी राज्यशासनाने १५ कोटी एक लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गंगाखेड शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. तसेच तारूगव्हाण (ता. पाथरी) येथील बंधाऱ्यासाठीदेखील निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शुक्रवारी (ता. दहा) पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील इतर विकासकामांच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली असल्याचे ही त्यांनी या वेळी सांगितले.

परभणीसह उस्मानाबाद व औरंगाबाद या तीन जिल्ह्यांच्या रखडेलेले विकास प्रकल्प व इतर समस्यांसंदर्भात गुरुवारी (ता. नऊ) औरंगाबाद येथे बैठक झाली. या बैठकीत परभणी जिल्ह्याच्या समस्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच ते तीन तास खासदार संजय जाधव यांच्यासह आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार सुरेश वरपुडकर व आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान, खासदार संजय जाधव यांनी जिल्ह्यातील औद्योगिक, कृषी, बांधकाम व इतर कामांचा आढावा घेतला.

या संदर्भात माहिती देताना खासदार संजय जाधव यांनी सांगितले की, पाथरी येथील साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पीकविम्याचा प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. जिल्ह्यातील पिकांचे २५ टक्केच्या वर नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न मागता मिळाला पाहिजे, अशी मागणी आम्ही केली. त्याच बरोबर कृषी विभागाचे विभाजन करून रिक्त पदांची तातडीने भरती करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवत तातडीने या कार्यालयाचे विभाजन करून भरती प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश संबंधित सचिवांना दिले आहेत, असेही श्री. जाधव यांनी सांगितले. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्नदेखील आम्ही बैठकीत उपस्थित केला. त्यावर तातडीने तोडगा काढला जाईल.


वैद्यकीय महाविद्यालयासाठी मागणी
परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जूनपासून सुरवात करावी, अशी आम्ही आग्रही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. मुळी बंधाऱ्यासाठी १५ कोटी एक लाख, जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी, नटराज रंगमंदिराचे नुतनीकरण व विस्तारीकरणासाठी सात कोटी रुपये निधीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांनादेखील तातडीने मंजुरी दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT