फोटो 
मराठवाडा

आम्ही जन्मापासूनच लॉकडाउनमध्ये हाय...! अंध दाम्पत्य

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जगभरात थैमान माजविलेल्या कोरोनाला हरविण्यासाठी नांदेड डाक टीम सर्व समांतर अंतर ठेवून व तोंडावर मास्क लावून आणि सोबत हँडवॉश ठेऊन नियमांचे पालन करीत देश सेवा करीत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. अशीच एक घटना मनाला चटका लावणारी. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या आदिवासी भागातील किनवट तालुक्यातील बोधडी येथे निराधार लाभार्थी पुंडलिक तुकाराम कांबळे व त्यांची पत्नी भागाबाई कांबळे यांना त्यांच्या घरी जावून निराधार योजनेचे पैसे दिले. यावेळी भागाबाई कांबळे यांनी आम्ही तर जन्मत:च लॉकडाऊन असल्याच्या काळीज पिळवटून टाकणारी भावना व्यक्त केली. 

हे दोघेही निराधार लाभार्थी असल्याने बोधडी येथील नांदेड डाक टीमचे पोस्टमन सुमेध संभा काळबांडे हे यांना लॉकडाउन असल्याने त्यांना निराधाराचे अनुदान देण्यासाठी गेले. त्यांच्या चालण्याच्या आवाजावरून एका तोडक्या मोडक्या झोपडीतून आवाज येतो पोस्टमन बापू दोष कुणाला ध्यावा.... आम्हीं जन्मापासूनच लॉकडाउनमध्ये हाय, आमची पगार आली काय. असा आवाज भागाबाई कांबळे यांच्या अत: करणातू बाहेर पडला. पोस्टमन म्हणतो हो आजी...पोस्टमन यांनी दोघांचे अंगठे व आधार मोबाईल स्कॅन करून घेऊन प्रत्येकी तीन- तीन हजार रुपये निराधार अनुदान शनिवारी (ता. चार) या गरीब अंध परिवाराना वाटप करण्यात आले. 

डाक टीम प्रत्येकाच्या दारी जाऊन पैशाचे वाटप करीत आहे

डाक टीम ग्रामीण भागात व शहरी भागातील नागरिकांसाठी दहा हजार रुपयापर्येंत कोणत्याही बँकेतील खात्यामधील पैसे काढण्याची व पैसे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण त्या खात्याला आधार जोडणे आवश्यक आहे. आशा बँक खातेदारांना व पोस्ट ऑफिस व इंडिया पोस्ट पेमेंट बँक खातेदारांना डाक टीम प्रत्येकाच्या दारी जाऊन पैशाचे वाटप करीत आहे. 

पन्नास लाखाचा विमा संरक्षण देण्यात यावा

डाक कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणू प्रादुर्भावामध्ये देश सेवा करीत आहेत. भारत सरकारने डाक कर्मचाऱ्यांना पण आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पन्नास लाखाचा विमा संरक्षण देण्यात यावे अशी नागरिकांत चर्चा केली जात आहे.

डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांचे आवाहन

डाक विभाग हे लॉकडाउनमध्ये दररोज ग्रामीण भागात व शहरी भागातील गरीब, अपंग, दिव्यांग, निराधार, आदिवासी भागात व दुर्मिळ भागात पोस्टमन मार्फत AEPS द्वारे पैशाचे मोठ्या प्रमाणात वाटप केले जात आहे. नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT