मराठवाडा

वेताळवाडीच्या तोफेला दणकट सागवानी गाडा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव मार्गावरील हळद्याच्या प्राचीन घाटात उभ्या असलेल्या वेताळवाडीच्या भक्कम किल्ल्यावरील तोफेला नवसंजीवनी मिळणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांनी ही तोफ रविवारी (ता. 28) सकाळी दणकट सागवानी तोफगाड्यावर विराजमान होणार आहे.

सातवाहनांच्या भोगवर्धनकडून (भोकरदन) उत्तरेकडे जाण्याच्या प्राचीन हळदा घाटात वेताळवाडीचा लहानसा; पण बलदंड किल्ला उभा आहे. दोन भव्य बुरुजांच्या आड लपलेला गोमुखी दरवाजा, मजबूत तटबंदी, भव्य बुरुज आणि उत्तर टोकावरील बारदरी हे इथले खास आकर्षण. या किल्ल्यावर पूर्वी तीन तोफा असल्याचे सांगितले जाते. मात्र, खान्देशच्या दिशेने असलेल्या दरवाजाजवळ एकमेव तोफ आता शिल्लक आहे. वर्षानुवर्षे गवतामातीत पडलेल्या या तोफेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कन्नड, चाळीसगावच्या किल्लेप्रेमींनी तोफगाडा बनवला आहे.

रविवारी सकाळी साडेनऊला जैन इरिगेशनचे संचालक अशोक जैन यांच्या हस्ते या तोफगाड्याचे दुर्गार्पण होणार असल्याचे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले. 

स्कॉटलंडच्या तोफगाड्यांच्या धर्तीवर, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तोफगाडा तयार झाला आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच युरोपियन पद्धतीचा हा तोफगाडा बसणार आहे. चाळीसगावचे अजय जोशी यांनी हा गाडा बनवला असून, यासाठी 70 हजार रुपयांचा निधी संस्थेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रकाश नायर यांच्या मित्रांनी संकलित केला आहे. 

श्रमिक गोडमगुंडे, कार्याध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान.

तोफांसाठी दोन चाकांचे गाडे सर्रास बघायला मिळतात. मात्र, जगभरातील विविध बनावटींच्या तोफा आणि गाडे भारतभर वापरले गेल्याचे मध्ययुगीन लघुचित्रांतून दिसून येते. लांब बांगडी तोफेसाठी असा गाडा वापरत.

देवगिरी, परंडा, औसा, कंधारसारख्या किल्ल्यांवर वेगवेगळ्या बनावटींच्या वैशिष्ट्यपूर्ण तोफा आहेत. प्रत्येकीचे गाडे तिच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या बनावटींचे होते. वेताळवाडीची तोफ लांबीला मोठी आहे. त्यामुळे तिथे आडवा गाडा असणे सयुक्तिक होते. सह्याद्री प्रतिष्ठानने मेहनतीने हा गाडा बनवून नवा प्रयोग केला आहे. 

- डॉ. तेजस गर्गे, संचालक, राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT