file photo 
मराठवाडा

परभणीकरांसाठी बुधवार ठरला धक्कादायक ; एकाच दिवशी नऊ पॉझिटिव्ह

गणेश पांडे

परभणी : परभणी जिल्ह्यात मोठ्या शहरातून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (ता.२०) या एकाच दिवशी जिल्ह्यात नऊ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता रुग्ण संख्या १६ वर गेली आहे. त्यामुळे आता जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.
परभणी जिल्ह्यात सुरुवातीपासून एकही रुग्ण नव्हता. परंतू हळूहळू परभणी जिल्ह्यात ही कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णु) या गावातील महिला कोरोनाबाधीत आढळून आली आहे. ही महिला मुंबईहून परतली होती. त्या महिलेच्या संपर्कात आलेले अन्य सहा जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्या सर्वांचे स्वॅब अहवाल बुधवारी (ता.२०) जिल्हा शासकीय रुग्णालयास सायंकाळी प्राप्त झाले. त्यात त्या महिलेच्या संपर्कात आलेले सहाजण देखील कोरोना विषाणुने बाधित झाले आहेत. तसेच गंगाखेड तालुक्यातील दोन व माटेगाव (ता.पूर्णा) येथील एक असे अन्य तीन रुग्णांचे अहवाल देखील पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी परभणी जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्हयातील रुग्णांची संख्या १६ वर गेली आहे. या पैकी केवळ एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. उर्वरित सर्व रुग्णांवर परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


हेही वाचा:​ भावावरच केले कुऱ्हाडीचे वार; कारण वाचून हैराण व्हाल...

चेकपोस्टवरील तपासणीवर संशयाची सुई
परभणी जिल्ह्याच्या चारही बाजूंना सीमा बंदीसाठी पोलिसांचे चेकपोस्ट लावण्यात आले आहे. या चेकपोस्ट ओलांडून लोक जिल्ह्यात येतातच कसे, हे न उलगडणारे कोडे आहे. जर लोक आडमार्गांनी जिल्ह्यात घुसले असतील तर त्यावर गावकरी व कोरोना ग्रामसुरक्षा समिती काय काम करत आहे, हा मोठा प्रश्न आहे.
 
परभणी जिल्ह्याची स्थिती

एकूण रुग्ण - १६
उपचार सुरु -१५
घरी सोडले - एक
मृत्यू - शून्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT