फोटो 
मराठवाडा

माळेगाव यात्रेत रघुवीर खेडकर काय म्हणाले...?...वाचा...

बापू गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : राजाश्रय मिळाला तरच लोकनाट्य तमाशा कलावंत व तंबूचा तमाशा जिवंत राहू शकेल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण व शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती लोकनाट्य तमाशा मंडळाचे अध्यक्ष तथा तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांनी सकाळ' शी बोलताना दिली. 

तमाशा फड नव्याने निर्माण होणं आता दुरापास्त झाले आहे. दोनशेवर कलावंत व सहका-यांना पालन पोषण करणं आता अवघड होते आहे. तंबूतील तमाशा त्यातील वग, गण, गवळण, रंगबतावणी हे सगळं तग धरून आहे. मात्र ही कला जोपासणारे कलाकार शोधले तरी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नविन कालाकर या क्षेत्राकडे वळत नाही. महाराष्ट्रातील ही लोककला वाचविण्यासाठी शासनानेही उदार मनाने या कलाकारांना मदत केली पाहेजे.  

बाजारू डान्स व उत्ताण कला व कलावंत टिकत नाही

कुठल्याही याञांनी महोत्सवात 'बाँबे डाँस' प्रचलित होऊ पहात आहे. या कला प्रकारात बाजारू डान्स नी उत्ताणदृष्य तोकडी वस्ञे, बिभत्स कला फोफावली आहे. असे कलावंत फार काळ टिकत नाहीत, पण लोककला अस्तंगत होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 
उतार वयाच्या  कलावंतांना विपन्नावस्थेत जीवन कंठावे लागत आहे. या अशा  कलावंतांना अधिक मानधन मिळावे ही जुनी व प्रलंबित मागणी आहे. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी विशेष लक्ष द्यावे.  कलावंतांच्या पाल्यांना शिक्षण, मुलामुलींचे विवाह ही बाब महत्वाची आहे. 

माळेगावला शाहिर पठ्ठे बापूराव कलामंच उभारावा

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगावला राज्यभरातून लोककलावंत हजेरी लावत असतात. ही एकमेव याञा प्रशासन चालवते. सांस्कृतिक बाब म्हणुन शाहिर पठ्ठे बापूराव कलामंच उभारावा म्हणजे  लोककला वृद्धींगत होईल. असे रघुवीर खेडकर यांनी सांगितले. 

माळेगावात ‘बॉंम्बे डान्स’ बंद 

माळेगाव यात्रा ही हौसे, गवसे व नवसे यांची असते. या यात्रेला राज्यभरासह शेजारील राज्यातील खंडोबारायाचे भक्त आपल्या दैवताचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. ही यात्रा पंधरा दिवस चालते. मात्र मागील काही घटनांचा आढावा घेतला तर यावर्षीही बॉम्बे डान्सला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली. माळेगाव यात्रेत महिला व मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक टवाळखोर तरुण बॉम्बे डान्सच्या नावाखाली हैदोस घालतात. त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असून माळगाव यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

बंदोबस्तवर स्वत: अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांचे लक्ष आहे. यात्रेत कुठलाच अनुचीत प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही असा त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

--दत्ताराम राठोड, अतिरिक्त पोलिस अधिक्षक , नांदेड. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT