File photo 
मराठवाडा

जिल्ह्यात मानव विकासच्या सायकलींची चाके रुतली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील आठवी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किलोमिटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना मानव विकास मिशनमार्फत राबविण्यात येते. मात्र दोन हजार ४०० मुलींपैकी केवळ दीड हजार मुलींनाच सायकल वाटप करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ३१ मार्चपर्यंत सायकल वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

निधी मिळूनही लाभार्थी वंचितच
मानव विकास मिशनने काही ठिकाणी बस पोहचत नसल्याने तसेच शाळेपासून पाच किलोमिटर अंतरावर राहणाऱ्या मुलींना सायकलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता आठवी ते दहावीच्या मुली तसेच उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता ११ वी ते १२वीच्या लाभार्थी मुलींचे नाव निश्चित केले जाते.यात गाव व शाळेपासून असलेले गावाचे अंतर याची तपशीलवार माहिती घेतली जाते. विद्यार्थिनींची यादी अंतिम केल्यानंतर त्या मुलीच्या बॅंक खात्यात सायकल खरेदीचा निधी जमा केला जातो. यासाठी ८४ लाख ८४ हजार रुपयांचा निधीही मंजुर करण्यातआलेला आहे. 

हा आहे मुख्य उद्देश
ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना प्रवासात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात येते. ग्रामीण भागांतून शहरे किंवा नजिकच्या खेड्यांत शिक्षणासाठी येजा करणाऱ्या विद्यार्थीनींसाठी मोफत बससेवा मानव विकास मिशन अंतर्गत सुरू आहे. तथापि, काही ठिकाणी या बसफेऱ्या जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित भागातील विद्यार्थीनींना शैक्षणिक प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत यावे लागते. यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो, तसेच त्यांची सुरक्षाही धोक्यात येते. ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशन अंतर्गत शालेय प्रवासासाठी विद्यार्थीनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते. राज्यातील १२५ अतिमागास तालुक्यांमध्ये इयत्ता आठवी ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किलोमिटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना ‘महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन’मार्फत राबविली जात आहे. या योजनेतून सायकल खरेदीसाठी प्रत्येक मुलीला कमाल तीन हजार रुपयांपर्यंतचा निधी मिळतो.  

तातडीने सायकल वाटपाच्या सूचना
काही ठिकाणी एकत्रितरित्या मुली सायकलवर येत असल्याने त्यांची सुरक्षितता वाढत आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत सायकल वाटपाची गती झपाट्याने होणे गरजेचे असते. यावर्षी दोन हजार ४३४ मुलींना सायकल वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. आता अर्धे शैक्षणिक वर्ष संपले असून पुढील तीन महिनेच सत्र राहणार आहे. आतापर्यंत केवळ दीड हजार मुलींनाच सायकलचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित मुलींना तातडीने सायकल वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
 
तालुकानिहाय लाभार्थी विद्यार्थिनी
तालुका -- एकूण शाळा -- एकूण विद्यार्थिनी
लोहा - २२ - ३७३
देगलूर - २४ - ४७३
बिलोली - १४ - ११२
धर्माबाद - १३ - ३२८
उमरी- ०९ - १३३
मुदखेड - ०५ - १६
भोकर - १७ -४७९
हिमायतनगर - ०४ -४१
किनवट - २१ - ४७९

एकूण - १२९ - २४३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : प्रमाणपत्र मिळाले तरी वैधता कठीण, जीआर कोर्टात टिकणार का? संभाजी ब्रिगेडला शंका

Ichalkaranji Politics : इचलकरंजीत शिंदे गट, भाजपचे टेन्शन वाढवणार? ३५ जागांची केली चाचपणी; महायुतीसाठी वजनदार मंत्र्यांच्या घरी बैठक

Post Office Scheme : आता हॉस्पिटलच्या खर्चासाठी काढावे लागणार नाही कर्ज, टपाल विभागाची 'ही' योजना आहे खास; ५ लाखांपर्यंत होणार उपचार

Larry Ellison: हवेली-रिसॉर्ट ते स्वत:च्या नावावर एक बेट; लॅरी एलिसन यांच्या जगभरातील प्रसिद्ध प्रॉपर्टीज कोणत्या?

Latest Marathi News Updates : सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर

SCROLL FOR NEXT