photo 
मराठवाडा

आमदार शासकीय कार्यालयाची सफाई करतात तेव्हा....

नवनाथ येवले

नांदेड : आढावा बैठकीनिमीत्त शासकीय कार्यालयात आलेले नांदेड (उत्तर) चे आमदार बालाजी कल्याणकर यांनी कार्यालयातील अस्वच्छतेवर संताप व्यक्त केला. स्वच्छतेचा उपदेश देणाऱ्या तालुक्याच्या मुख्यालयाची अवस्था पाहून स्वत: हातात झाडू घेत पिचकाऱ्यांनी रंगलेल्या कार्यालयाच्या भिंतीची आमदार श्री. कल्याणकर यांनी स्वच्छता सुरु केली. आमदार श्री. कल्याणकर यांनी ऐनवेळी हातात झाडू घेवून स्वच्छतेला सुरवात केल्याने कार्यालयीन कामात व्यस्त असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. मग काय तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारीही झाडू घेवून स्वच्छता अभियानात सहभागी झाले. 

नांदेड (उत्तर) विधानसभा मतदारसंघातील संभाव्य पाणीटांचाईवर उपाययोजनांच्या अनुषंगाने सोमवारी (ता. १३) आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समाजकल्याणच्या सभापती शीला निखाते, पंचायत समिती सभापती कावेरी वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, उपसभापती ॲड. राजू हटकर, तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड, गटविकास अधिकारी यू. डी. तोटावार, विस्ताराधिकारी जीवन कांबळे, बबन वाघमारे, बालाजी सूर्यवंशी, माजी सभापती सुखदेव जाधव, देविदास सरोदे, अनिल पाटील, नारायण कदम आदींची उपस्थिती होती.

दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही 
मतदारसंघातील ३८ गावांच्या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनार्थ पंचायत समितीच्या आढावा बैठकीमध्ये आमदार श्री. कल्याणकर यांनी मतदारसंघातील हातपंप दुरुस्ती, इंधन विहीर दुरुस्ती, विहीर दुरुस्ती, गाळ काढणे, पाइपलाईन यासह उपाययोजनांचा आढावा घेतला. दरम्यान, गावखेड्यात सक्षम उपाययोजनांची ताकीद देत टंचाईमुक्त गाव संकल्पना कृतीत उतरविण्यासाठी ग्रामसेवकांनी तप्तर रहावे. नागरिकांना स्वच्छतेच्या सुविधांसह टंचाई काळात मुबलक पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी कामात दिरंगाई खपवून घेणार नसल्याची तंबी आमदार श्री. कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.

आढवा बैठकीनंतर स्वच्छता अभियान 
टंचाई निवारणार्थ आढावा बैठक संपल्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यातील तहसील कार्यालयात फेरफटका मारताना पिचकऱ्यांनी रंगलेल्या भिंती, स्वच्छतेअभावी निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यावर संताप व्यक्त करत आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वत: हातात झाडू घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहभागी करत तहसील कार्यालयात स्वच्छता अभियान राबवले. 

सर्वांनी घेतले हातात झाडू
स्वत: हातात झाडू घेऊन कार्यालयाची स्वच्छता करत असताना आमदार कल्याणकर यांनी थेट तहसीलदार डॉ. जऱ्हाड यांच्याही हातात झाडू सोपविला. आमदार आणि तहसीलदार स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता करत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाईलाजाने का होईना हातात झाडू घेऊन स्वच्छता करावी लागली. दरम्यान, आमदार श्री. कल्याणकर यांनी पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमधील एन्ट्री स्वच्छता मोहिमेमुळे दमदार ठरली.
नवनाथ येवले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT