NND01KJP03.jpg 
मराठवाडा

राज्यातील पहिल्या उर्दू घराचे उद्‍घाटन कधी होणार?

कृष्णा जोमेगावकर

नांदेड ः राज्यातील पहिले उर्दू घर म्हणून लौकीक असलेल्या नांदेड शहरातील उर्दू घराच्या उद्‍घाटनाला अद्याप वेळ मिळाला नाही. मदिनानगरमध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीत उर्दू भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न होणार आहेत.

भाषेच्या समृद्धीसाठी उर्दू घर
उर्दू भाषेची वाड्मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत आदी सृजनशील विचारांची देवाणघेवाण व्हावी. या सोबतच उर्दूचा भाषेच्या समृद्धीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण असावे, या उद्देशाने राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून ता. चार फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार नांदेड शहरातील मदिनानगर येथे उर्दू घर स्थापनेला मंजूरी मिळाली होती. 

साडेसात कोटींचे उर्दू घर
मदिना तुल उलूम शाळेजवळ महापालिकेच्या जागेवर उर्दू घर उभारण्यासाठी तत्कालीन शासनाने आठ कोटी १६ लाख रुपयांच्या खर्चाच्या मान्यता दिली. यानंतर सर्व बाबी पूर्ण करुन मागील वर्षापूर्वी राज्यातील पहिले सुसज्ज असे उर्दू घर अस्तित्वात आले. परंतु यानंतर या वास्तूचे उद्‍घाटन करण्याला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. यापूर्वी उद्‍घाटनाबाबत अनेकवेळा चर्चा झाली परंतु अद्याप या कामी संबधीतांनी पुढाकार घेतला नाही. या उर्दू घराच्या व्यवस्थापन, देखभाल, दुरुस्ती व कार्यालयीन खर्चासाठी सहा लाख ९४ हजाराचा निधी प्राप्त झाला आहे. यातून आतापर्यंत चार लाख ७७ हजार रुपये खर्च झाले आहेत.

विलंबामुळे वास्तुची नासधूस
या वास्तूच्या उद्‍घाटनाला लागलेल्या विलंबामुळे या ठिकाणी आग लागून त्यातील साहित्याची नासधूस झाली होती. यानंतर या उर्दू घराच्या दुरुस्तीसाठी आणि अतिरिक्त कामासाठी जानेवारी २०१९ मध्ये ३८ लाखांचा निधी मिळाला. यातून उर्वरीत कामे अंतिम टप्यात आली असल्याची माहिती नियोजन विभागाकडून मिळाली. परंतु या वास्तुचे उदघाटन करण्यास राज्यकर्त्यांना अद्याप वेळ मिळाला नसल्याने शासनाने ज्या उद्देशाने विशेष बाब म्हणून नांदेडला उर्दू घराची स्थापना केली तो उद्देश सफल होताना दिसत नाही.

उर्दू अकादमीची मदत घेण्याच्या सूचना
उर्दू घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्‍घाटन मागील काही महिन्यापासून रखडले आहे. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दखल घेऊन या उर्दू घराचा उपयोग कसा घेता येईल?, यासाठी मुंबई येथे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात स्थापन झालेल्या उर्दू अकादमीची मदत घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार येथील कामकाज चालावे, असे त्यांनी सुचित केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT