Latur News 
मराठवाडा

Video : दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार पकडणे नव्या सरकारची मोठी जबाबदारी

सुशांत सांगवे

लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या प्रागतिक विचाराचे सरकार राज्यात आले आहे. या सरकारने सूत्रधार पकडावेत, अशी मागणी 'अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी केली.

'वेध : गौरव बंडखोरीचा' या कार्यक्रमासाठी डॉ. हमीद दाभोलकर लातूरमध्ये आले होते. या वेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पडकले गेले आहे. त्यामुळे खूनामागचा विचार काय होता, हे देखील स्पष्ट झाले आहे. पण सूत्रधार अजून सापडले नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सूत्रधार लवकर पकडले जावेत, अशी आमची अपेक्षा आहे. 

मागील सरकारने यात चालढकल केली का, या प्रश्नावर बोलताना हा न्यायालयीन विषय असल्याने मागील सरकारवर टिपण्णी करणार नाही, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ज्या उद्दीष्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला होता, त्या उद्दीष्ठात, विचारात संबंधीत संघटना यशस्वी झाल्या नाहीत. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार, त्यांचे कार्य दुप्पट जोमाने अंनिसचे कार्यकर्ते सध्या पुढे नेत आहेत. 

नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वत्र प्रबोधन केले. सूर्यग्रहणाशी संबंधीत अनेक अंधश्रद्धा आजही आहेत. याबाबत जनजागृती केली. आता ३१ डिसेंबर रोजी चला व्यसन बदनाम करूया, ही मोहिम आम्ही राज्यभर राबविणार आहोत.

म्हणून मी हमीद

आडनाव दाभोलकर असूनही हमीद नाव का, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजवर तो अनेकांनी मला विचारलाही. खरंतर वडिलांनी हमीद दलवाई यांचे नाव मला दिले. नावावरून धर्म ओळखला जाऊ नये आणि त्यांच्या वाटेवरून पुढे जावे, हा विचार त्यामागे होता, असे हमीद दाभोलकर यांनी वेध : गौरव बंडखोरीचा या कार्यक्रमात सांगितले. 

धर्माच्या नावावरून समाजात दुही निर्माण केली जात आहे. एकमेकांत कटुतेचे वातावरण तयार केले जात आहे. अशा काळात दलवाईंना आपल्याला वगळता येणार नाही. एकतेचा विचार पुढे न्यावा लागेल.

बंडखोरी करताना व्यक्ती म्हणून, नातेसंबंध म्हणून, कुटूंब म्हणून जे काही प्रसंग वाट्याला येतात ते भोगायची तयारी असावी लागते. पण बंडखोरी शिकवून येत नाही. पण, आपल्या प्रत्येकाच्या आयूष्यात बंड करण्याच्या छोट्या-छोट्या जागा असतात, त्या जागा आपण शोधाव्यात, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT