Aurangabad news  
मराठवाडा

पुरुष न धुतलेली अंडरवेअर वारंवार का घालतात... वाचा 

सकाळ डिजिटल टीम

स्वच्छता हाच खरा दागिना, ही म्हण फक्त शाळेत शिकण्यापुरतीच ठेवलेली आहे का? स्वच्छतेविषयी जागरुकतेचे अनेक कार्यक्रम घेऊनही लोक स्वच्छ का वागत नसतील, या प्रश्नांची उत्तरे शोधताना एक अतिशय विचित्र बाब समोर आली आहे, ती म्हणजे पुरुषांच्या वैयक्तिक अस्वच्छतेविषयी... 

महिलांपेक्षा पुरूष अधिक अस्वच्छ राहतात, असे एका पाहणी अहवालात समोर आले आहे. आणि त्यातील अत्यंत किळसवाणी बाब म्हणजे, ९३ टक्के महिला आपली अंतर्वस्त्रे एकदा वापरली, की धुवायला टाकतात किंवा स्वतः धुवून टाकतात. परंतु, तब्बल १८ टक्के पुरूष न धुतलेल्या अंडरवियर्सच पुन्हा पुन्हा वापरतात. 

एका पोर्टलने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे.

महिलांना येते किळस

या सर्वेक्षणातून आणखीही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आपण न धुतलेली अंडरवेअर तशीच पुन्हा घालतो, हे बहुतांश पुरुषांनी मान्य केले आहे. पुरुषांच्या या सवयीची महिलांना मात्र किळस येते, असेही अनेक महिलांनी कबूल केले आहे. 

या सर्वेक्षणातील काही तथ्ये

  • पुरूष हे महिलांपेक्षा जरा जास्तच अस्वच्छ राहतात
  • ते एकच बेडशीट चार चार आठवडे न धुता वापरतात
  • महिला मात्र एक बेडशीट तीन आठवडेच वापरतात
  • पुरूषांच्या वापरातील वस्तूंवर महिलांच्या वापरातील वस्तूंपेक्षा १० टक्के जास्त जंतू असतात
  • तब्बल ७८ टक्के महिला साबणाने हात धुतात. पण ५० टक्के पुरुष साबण वापरत नाहीत

पुरुषांना घाण राहायला आवडते का... 

पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक वेळा कपडे बदलतात. मुलांसारख्या मैदानी खेळात मुली कमी असतात. त्यांचा अधिकाधिक वेळ घरातच जातो. त्यामुळे त्यांचे कपडे पुरुषांच्या तुलनेत कमी खराब होतात. लहानपणीच्या या सवयी मोठ्या झाल्यावरही कायम राहतात. पण याचा अर्थ असा नाही, की पुरुषांना स्त्रियांपेक्षा घाणेरडे राहायला आवडते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: दुष्काळात तेरावा! उपनगरात विजेचं महासंकट, तळोजा उपकेंद्रात भीषण आग; वीजपुरवठा खंडित

Pune: आंबेगावच्या मातीतून घडले शेतकरी कुटुंबातील चार पोलीस उपनिरीक्षक; वर्षभराचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

Shaktipeeth Highway Protest : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

Navi Mumbai: डेटा सेंटरसाठी २८२ कोटींची जमीन, महामुंबईतील सर्वात महागडा व्यवहार

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडचा १०० व्या सामन्यात शतकी धमाका! द्रविड-गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT