file photo 
मराठवाडा

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती सतत त्रास देऊन तिला मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून पिडीतेने विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना टाकळी (ता. माहूर) येथे ता. १३ ते १५ एप्रीलच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मंगळवारी (ता. २१) मार्च रोजी माहूर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दातोडी (ता. आर्णी, जिल्हा यवतमाळ) येथील बंडू तुकाराम देवतळे (वय ६७) यांची मुलगी रेखा (वय ३५) हिचे लग्न माहूर तालुक्यातील टाकळी येथील अशोक धर्माजी घाळवटे (वय ४२) याच्यासोबत रितीरिवाजानुसार मागील काही वर्षापूर्वी झाले होते. लग्नांनंतर रेखा हिला काही दिवस चांगले नांदवले. मात्र तो नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच या दोघांमध्ये वाद भडकत असे. अशोक घाळवट हा दारुच्या सवयीचा असल्याने तो रोज सांयकाळी दारु पीऊन घरी यायचा. त्यानंतर पत्नीला शिविगाळ करुन तिला वेळप्रसंगी मारहाण करत असे. एवढेच नाही तर तु तुझ्या माहेराहून घरखर्चासाठी पैसे आण म्हणून तगादा लावत असे. 

आत्महत्येस कारणीभूत व हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा दाखल 

सासरी पतीचा होणारा त्रास तीने आपल्या माहेरी सांगितला होता. माहेरच्या मंडळीनीही त्याला समज दिली. मात्र त्याच्या वागण्यात काही बदल होत नव्हता. सतत तिचा अपमान करुन शिविगाळ करत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून रेखा घाळवट हिने ता. १३ एप्रील ते १५ एप्रीलच्या दरम्यान वीष पीऊन आत्महत्या केली. तीच्या मृत्यूस पती अशोक घाळवट हाच जबाबदार असल्याची तक्रार तिचे वडिल बंडू देवतळे यांनी माहूर पोलिस ठाण्यात दिली. यावरुन पोलिसांनी पती अशोक घाळवटविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत व हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. तीडके करत आहेत. 

वाळू माफियावर गुन्हा दाखल

सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसस्टॅन्ड परिसरात एका टीप्परमध्ये दहा हजाराची दोन ब्रास वाळू विनापरवानगी बेकायदेशिररित्या वाहतुक करताना सापडला. पोलिसांनी त्या वाळू माफियाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील वाळू जप्त केली. पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स्व: ता श्री. चव्हाण करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT