suicide sakal
मराठवाडा

Parbhani : पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या,मुलामुळे घटना आली उघडकीस

मुलाने ग्रामस्थांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघांनीही घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

सकाळ वृत्तसेवा

पालम (जि.परभणी) : तालुक्यातील (Palam) पुयनी येथील पती-पत्नीने गळफास लावून जीवनयात्रा संपल्याची दुःखद घटना सोमवारी (ता.दहा) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्ये (Parbhani) मागील नेमके कारण समजू शकले नाही. तालुक्यातील पुयनी येथील रंगनाथ हरिभाऊ शिंदे (वय 40) आणि सुनिता रंगनाथ शिंदे (वय 35) यांच्या खोलीचे दार सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत उघडले नव्हते. शेतातून आल्यावर त्यांचा मुलगा अंगद याने आई-वडील झोपलेल्या खोलीचा दरवाजा वाजविला. बऱ्याच वेळानंतरही खोलीतून आवाज आला नाही. म्हणून मुलाने ग्रामस्थांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघांनीही घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.(Wife-Husband Hanged Themselves In Palam Taluka Of Parbhani)

घटनेची माहिती पुयनी येथील पोलीस पाटील गेंदे यांच्यामार्फत पालम पोलिसांना देण्यात आली. पालम ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहत्तरे, फौजदार विनोद साने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह पालम ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आले होते घटनेसंदर्भात पालम पोलीस ठाण्यात बातमी लिहीपर्यंत नोंद करण्यात आले नसल्याने घडलेली घटना नेमकी कशामुळे घडली आहे याचे अद्याप गुढ कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT