पाण्याच्या शोधात (पक्षिमित्र विजय ढाकणे) 
मराठवाडा

जिंतूर परिसरात तळपत्या उन्हात पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती

गेल्या पावसाळ्यात तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला असला तरी तीन महिन्यापासून उन्हाचा कडाकाही जाणवत आहे

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तळपत्या उन्हात तहानलेल्या ( Hot Temprature) वन्यजीवांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरु असल्याचे चित्र तालुक्यातील डोंगर भागात दिसत आहे. इटोली परिसरातील (Jintur Itoli area lake) डबक्यात साचलेल्या पाण्यावर तहान भागवतांना, भटकंती करताना नीलगायी, हरीण व मोर व इतर पक्षाचे थवे पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. (Wildlife roaming for water in the scorching sun in Jintur area)

गेल्या पावसाळ्यात तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला असला तरी तीन महिन्यापासून उन्हाचा कडाकाही जाणवत आहे. रोज दुपारी बारा ते पाचपर्यंत उन्हाचा पारा ३७ ते ३८ अंशावर स्थिरावत आहे. गेल्या चार दिवसापासून ३९ अंशापर्यंत पोचत आहे. त्यामुळे भूपृष्ठावरील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने डोंगर भागातील पाणवठे, ओढा- नाले कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे वन्य जीवांची पाण्यावाचून घालमेल होत आहे.

हेही वाचा - नायगावचे आमदार राजेश पवार यांना रामदास आठवलेंचा विसर

तालुक्याच्या डोंगराळ भागात नीलगाय, हरिण, काळवीट, रानडुक्कर, सायाळ हे प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. कांही ठिकाणी बिबटेही तुरळक प्रमाणात आढळून येतात. तसेच मोर व अन्य प्रजातीचे अनेक प्रकारचे पक्षीही आहेत. दुपारच्या सुमारास हे वन्यजीव तहान भागवण्यासाठी पाण्याच्या शोधात दूरदूरपर्यंत भटकंती करताना दिसतात. विशेषतः पूर्णा, कृपया या नद्यांच्या व पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फिरताना दिसतात.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: हपकिनच्या कामकाजाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तुकाराम मुंडे यांच्याकडेच पदभार ठेवा: वळसे पाटील यांची विधिमंडळात मागणी

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT