jayant patil Sakal
मराठवाडा

Jayant Patil : आरक्षण मर्यादेचा अडथळा दूर करणार

सोयाबीनचे दर पडले असून खतांच्या किमती प्रचंड वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

आष्टी - सरकारने कर आकारण्यासाठी एकही गोष्ट सोडली नाही. गेल्या दहा वर्षांत या सरकारने प्रचंड लूट केली आहे. आज तुम्हाला केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार एवढेच पैसे दिसतात. परंतु वर्षभरात जीएसटीच्या नावाखाली तुमच्या खिशातून लाखो रुपये काढून घेतले आहेत.

सोयाबीनचे दर पडले असून खतांच्या किमती प्रचंड वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. दिल्लीत आमचे सरकार आल्यानंतर ५० टक्क्यांपर्यंतच्या आरक्षणाचा अडथळा कायद्यान्वये दूर करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

लोकसभेच्या बीड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार संदीप क्षीरसागर, उषा दराडे, सुशीला मोराळे आदी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मालावर निर्यातबंदी घालून शेतकऱ्याला खड्ड्यात घालायचे पाप सरकारने केले आहे.

ज्या संविधानाने यांना दिल्लीत सरकार स्थापनेची संधी दिली त्याच संविधानाच्या डोक्यावर पाय ठेवायचे काम सरकारने केले. ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणू आणि या देशाचे संविधान बदलू, असे पाप यांच्या डोक्यात आहे. सोन्याचे भाव वाढले, डॉलरची किंमत वाढली, महागाई वाढली आहे. परंतु या दहा वर्षांत सरकारच्या धोरणांमुळे मूठभर लोकच श्रीमंत झाले’.

आधी रोजगाराचे बोला : अमोल कोल्हे

जातीच्या नावाने विष पेरणाऱ्या लोकांना एकच सांगा, पोटाची आग नियंत्रणात आणणाऱ्या भाकरीला जात नसते. त्यापेक्षा तुम्ही आधी रोजगाराचे बोला, असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. ‘कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कोण करणार? फ्यूचर गेमिंग कंपनीने ५०० कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉण्ड दिल्यामुळे मोदींनी देशातील युवकांचे भविष्य त्यांना विकले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे’, असा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''हे दोन प्रश्न विचारले म्हणून जरांगे मला संपवायला निघालेत'', धनंजय मुंडेंकडून समोरासमोर चर्चा करण्याचं आवाहन

Mosque Blast : 'जुमे की नमाज' सुरू असतानाच मशिदीत भीषण स्फोट; ५० पेक्षा अधिकजण जखमी

Latest Marathi News Live Update : अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

Stray Dogs Case: महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर भटके श्वान आणि प्राण्यांना प्रवेशबंदी! सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

Dhananjay Munde: कर्मा रिपीट्स... मनोज जरांगे खूप महागात पडेल, धनंजय मुंडेंनी दिला इशारा! CBI चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT