Kulaswamini Kala Kendra Paithan  esakal
मराठवाडा

कुलस्वामिनी कला केंद्रावर मोठी घटना; नृत्यांगणा नाचत असताना प्रेक्षकांच्या सात ते आठ वाहनांवर जोरदार दगडफेक

याबाबत अद्यापपर्यंत पाचोड पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

मुनाफ शेख

या कला केंद्राला बांधकाम सुरु असल्यापासून परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकांचा विरोध आहे. परंतु, कला केंद्राला कायदेशीर मान्यता असल्याने हे कला केंद्र आज थाटात सुरु झाले होते.

पैठण तालुका (Paithan Taluka) हा संताची भूमी म्हणून राज्यात नव्हे, तर देशात प्रसिध्द असताना या तालुक्यातील हिरापूर-थापटी तांडा ग्रामपंचायत हद्दीतील धुळे-सोलापूर महामार्गावरील (Dhule-Solapur Highway) देवगाव फाटा इथं सुरु झालेल्या कुलस्वामिनी कला केंद्रावर नृत्यांगणांचे नृत्य बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या वाहनांवर मंगळवारी (ता. १८) साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी सात ते आठ वाहनांच्या काचा फोडून कारची मोडतोड केल्याची घटना घडलीये.

यामुळं घाबरलेल्या कलावंतांनी कला केंद्र बंद केल्याची घटना घडली. मात्र, याबाबत अद्यापपर्यंत पाचोड पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. आधीच हे कला केंद्र चालू होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, हिरापूर-थापटी ग्रामपंचायतीसह परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकांसह महिलांनी या कला केंद्राविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पाचोड पोलिसांनी दोन्ही कडील बाजू ऐकून दोन्ही पक्षाला १४९ ची नोटीस देऊन तुर्तास कला केंद्र सुरु करु नये, अशी सूचना देऊन रस्ता रोकोची परवानगी नाकारली होती.

मात्र, आज अचानक हे कला केंद्र सुरु झाल्याची वार्ता परिसरात पसरताच अनेक नागरिकांनी एकत्र येत कला केंद्रात नृत्य बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करीत काचा फोडल्या. यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नसली, तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

केंद्राला सर्व स्तरातून विरोध, भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता

या कला केंद्राला बांधकाम सुरु असल्यापासून परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकांचा विरोध आहे. परंतु, कला केंद्राला कायदेशीर मान्यता असल्याने हे कला केंद्र आज थाटात सुरु झाले होते. मात्र, कला केंद्र सुरु होताच परिसरातील संतापलेल्या काही जणांनी कला केंद्राकडे धाव घेऊन तिथं उभ्या असलेल्या वाहनांवर दगडाचा वर्षाव करुन गाड्यांचे मोठे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने कलावंतांनी ताबडतोब कलेचे सादरीकरण थांबवून केंद्र बंद केले. दरम्यान, या केंद्राला सर्व स्तरातून विरोध होत असल्याने भविष्यात येथे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच यावर तोडगा काढावा, अशी मागणी परिसरातील सूज्ञ नागरीक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: आपदा मे अवसर! पुराच्या पाण्यात वॉटर पार्कसारखा एन्जॉय, नालासोपाऱ्यातला व्हिडिओ व्हायरल

रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला २३ लाखांचा गंडा; नेपथ्यकारानेच फसवलं, कसं? नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Update : खडकवासला ८१ टक्के भरले, मुठा उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू

Suryakumar Yadav: 'माझा नेहमीच टीम इंडियाला पाठिंबा, माझ्याबद्दल चूकीचं...', सूर्या स्पष्टच बोलला; वैभव सूर्यवंशीलाही खास मेसेज

'वडील मुख्यमंत्री आहेत म्हणून याला…', टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...

SCROLL FOR NEXT