photo 
मराठवाडा

महिनाभरातच हिंगोली-मुंबई बससेवा पडली बंद

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली येथून मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केलेली स्लिपर कोच बससेवा महिनाभरातच बंद पडली. लांबपल्ल्यासाठी खिळखिळ्या बस मिळाल्याने बसमध्ये बिघाड होत होता. यामुळे महिनाभरातच ही सेवा बंद करण्याची नामुष्की एसटी आगारावर ओढावली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनाद्वारे प्रवास करावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगारास सन २०१९ च्या शेवटी दोन स्लिपर कोच बस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी पहिली बस आगारास डिसेंबर महिन्याच्या सुरवातीलाच देण्यात आली. परंतु, ही बस परभणी जिल्ह्यातील एका आगारास देण्यात आली होती. तीच बस हिंगोली आगारास देण्यात आली. ही बस प्राप्त झाल्यानंतर दुसरी बस प्राप्त होण्यास बराच विलंब झाला.

हेही वाचा-प्रधानमंत्री मुद्रा योजनेने दिली ‘नॅचरल दिशा’ ​

लांबपल्ल्यासाठी मिळाली जुनीच बस

त्यामुळे आगारास प्राप्त झालेली स्लिपर कोच बस आगाराच्या कार्यशाळेत बरेच दिवस उभी होती. यानंतर डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दुसरी प्राप्त झाली. हिंगोली आगारासाठी दोन स्लिपर बस प्राप्त झाल्याने लांब पल्ल्याच्या बसेस सुरू होतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. तसे हिंगोली आगाराने डिसेंबरअखेरीस हिंगोली- मुंबई स्लिपर कोच बससेवा सुरू झाली. मात्र, हिंगोली आगाराला मिळालेल्या दोन स्लिपर बस पैकी एक जुनीच बस देण्यात आली होती. त्यामुळे ही बस घाटात बंद पडत होती. तसेच काही किलोमीटर धावल्यानंतर बसमधून पाण्याची गळती होत होती.

 

येथेही क्लिक करा-निर्बल पुरुषांनाही कसा होतो कच्च्या केळीचा फायदा, वाचा...


एक ते दोन वेळाच बस धावली

परिणामी बसच्या दुरुस्तीचे काम वाढले. जानेवारी महिन्यात एक ते दोन वेळाच ही बस मुंबईसाठी धावली. त्यानंतर मात्र, दोन्ही बस आगारातच उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईसाठी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तसेच मोठा गाजावाजा करून बस सुरू केल्याचे सांगणाऱ्या हिंगोली आगारावर बसफेरी बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच परभणी विभागीय नियंत्रकांनी ही बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हिंगोली आगारातील श्री. पुंडगे यांनी दिली.

हिंगोली आगारात बसला ‘दे धक्‍का’

एसटी महामंडळाच्या अनेक बसची अवस्था खिळखीळी झाली आहे. बुधवारी (ता. २२) सकाळी अकराच्या सुमारास बिलोली- रिसोड ही बस हिंगोली स्थानकात आली होती. त्यानंतर बस रिसोडकडे जाण्यासाठी चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, बस सुरूच झाली नाही. शेवटी बसमधील प्रवाशांनी बसला धक्का देत चालू केली. त्यानंतर ही बस मार्गस्थ झाली.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT