A woman arrested with 16 kg of ganja in Jalna 
मराठवाडा

सोळा किलो गांजा जप्त!

सकाळ वृत्तसेवा

जालनाः शहरातील नूतन वसाहत परिसरातील बँक सहकार कॉलनी येथे कदीम जालना पोलिसांनी सोमवारी (ता. १३) दुपारी छापा टाकून पंधरा किलो ८६८ ग्रॅम गांजासह एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

शहरातील नूतन वसाहत परिसरात एक महिला गांजा घेऊन येणार असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांच्या पथकाने छापा टाकून बँक सहकार कॉलनी येथे एका महिलेच्या ताब्यातून सात लाख ९३ हजार ४०० रुपये किमतीचा १५ किलो ८६८ किलो गांजा जप्त केला आहे;  तसेच या महिलेल्या कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हि कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास शेळके, सहायक पोलिस निरीक्षक देविदास सोनवळे, निशा बनसोडे, कर्मचारी कृष्णा चव्हाण, गणेश जाधव, रमेश काळे, विठ्ठल खार्डे. प्रताप जोनवाल, रवी खलसे, महिला कर्मचारी मेघा नागलोत यांनी केली.

 दरम्यान, जालना शहरात मागील काही महिन्यांपासून गावठी पिस्तुलासह गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात पोलिसांना य़श आले आहे. यात गतवर्षाअखेर दहा गावठी पिस्तूल, कदीम हद्दीत स्थनिक गुन्हे शाखेने ७२ किलो गांजा जप्त केला, मंठा पोलिसांनी ४०० किलो गांजा अशा मोठ्या कारवाया केल्या आहेत; मात्र, जिल्ह्यात गावठी पिस्तुलासह गांजाही आणला जात असल्याचे चित्र असून पोलिस या गुन्ह्याच्या मुळाशी जाणार का हाच खरा प्रश्न आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT