Nanded News 
मराठवाडा

Video - स्त्रीशक्तीचा असाही जयजयकार :  कसा तो पहा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रत्येक थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी म्हटले की फोटोंना हारतुरे घालून, त्यांच्याविषयी भाषण करणे. परंतु, नांदेडमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये महिलांसह शालेय विद्यार्थिनींनी फेरीच्या माध्यमातून ‘स्त्रीशक्ती’चा जयजयकार करून परिसर दणाणून सोडला.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात महिलांनी अभिवादन फेरी काढली होती. राज कॉर्नर येथून या फेरीला सुरुवात झाली. भाग्यनगर पोलिस ठाण्याचे अनिरुद्ध काकडे यांनी फेरी हिरवी झेंडी दाखवली. वंदना गुंजकर यांनी प्रास्ताविक केले. या फेरीमध्ये विविध क्षेत्रांतील महिलांसह शालेय विद्यार्थिनींनी वेशभूषा करून सहभाग नोंदवला. धरती नर्सिंग स्कुलच्या ५० विद्यार्थिनी गणवेशासह फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या. फेरीतील सहभागी सर्वांनी स्त्रीशक्तिचा जयजयकार केलाच; शिवाय हातातील फलकांच्या माध्यमातून समाजप्रबोधनही केले. आयटीआय चौकातील फुले दाम्पत्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ फेरीचा समारोप झाला.  दरम्यान आमदार बालाजी कल्याणकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मुलींसाठी निवासी अभ्यासिका वर्षभरात सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. 

शुभांगी शिंदे, योगिनी शिंदे, संगिता गाभणे, पार्वती माटे, लता गोरे, शोभा सावंत, लता राऊत, सुरेखा शिंदे, वैशाली गुंजकर, लता बंदमवार, सरोज भोकरे, रेखा रासे, भारती देशमुख आदींसह प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, सोनू कल्याणकर, विजय गाभणे, साहेबराव सावंत, राजेंद्र वानखेडे, प्रा. डॉ. श्रीमंत राऊत, रामचंद्र सावंत, श्रीकांत गुंजकर, कालिदास शिंदे, श्‍यामसुंदर गोरे, नारायण शिंदे यांनी फेरी यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aundh Water Crisis: औंधसह परिसरावर पाणीटंचाईचे सावट; येळीव तलाव कोरडा, साठा झपाट्याने कमी होत असल्याने टँकरची मागणी

'माझ्या आईने ओळखलंच नाही' तुंबाडची मंजुळामधील साधूच्या भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे म्हणाले...'तेव्हा आईला सुद्धा...'

Health Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक घेतात अति टेन्शन! वयापेक्षा जास्त ताण घेतल्याने कमी वयातच जडतात आजार

Latest Marathi News Update : महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल : मंत्री संजय शिरसाट

Police Success Story: खाकीचे स्वप्न साकार झाले... पण वर्दीतील लेकरांना पाहायला वडील नव्हते; साताऱ्यातील जिद्दी तरुणांची यशोगाथा..

SCROLL FOR NEXT