file photo 
मराठवाडा

‘या’साठी महिलेचे कान तोडले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कंधार न्यायालयात साक्ष देऊन घराकडे परत येणाऱ्या एका महिलेला रस्त्यात अडवून तिच्या कानातील सोन्याच्या काड्या अज्ञातानी जबरीने तोडून नेल्या. यात महिलेचे दोन्ही कान तुटले असून ती महिला जखमी झाली आहे. ही घटना गंगणबीड (ता. कंधार) शिवारात शुक्रवारी (ता. तिन) जानेवारी दुपारी घडली. 
  
नागदरवाडी (ता. कंधार) येथील कौशल्याबाई लक्ष्मण केंद्रे (वय ६०) ह्या शुक्रवारी (ता. तिन) जानेवारी रोजी सकाळी कंधार न्यायालयात एका प्रकरणात साक्ष देण्यासाठी गेल्या होत्या. न्यायालयात साक्ष देऊन त्या आपल्या घराकडे निघाल्या. कंधार चौकातून त्या प्रवाशी ॲटोने घोडज पाटीपर्यंत आल्या. त्यानंतर त्यांच्या गावी जाण्यासाठी दुसऱ्या वाहनाची त्या वाट पहात तिथेच थांबल्या. बराच वेळ वाहनाची वाट पाहून वाहन येत नसल्याचे पाहून तिने उशिर होत असल्याने ती घराकडे रस्त्याने एकटीच पायी निघाली. 

अनोळखी दुचाकीचालकाचा कारनामा

ती गंगणबीड शिवारात पोहचताच तिच्या पाठीमागून एक अनोळखी व्यक्ती आपल्या दुचाकीवरून त्यांच्याजवळ आला. त्याने तिला अडविले. डोक्यात बुक्या मारून खाली पाडले. त्यानंतर त्याने त्या महिलेच्या कानातील दोन सोन्याच्या बाळ्या (काड्या) जबरीने तोडून घेतल्या. यावेळी त्यात महिलेचे दोन्ही कान तुटले. त्यानंतर हा तोंडाला बांधून आलेला चोरटा हा आपल्या दुचाकीवरून पसार झाला. रक्ताळलेल्या कानाला धरून ती महिला मोठमोठ्याने रडत होती. हा प्रकार शिवारात काम करणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी तिला रडतांना पाहिले व लगेच तिच्या घरी निरोप पाठविला. त्यांना या महिलेनी घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार अगदी तिच्या गावाजवळ घडल्याने काही वेळाने तिचे नातेवाईक घटनास्थळी आले. 

नातेवाईकांची घटनास्थळाकडे धाव

त्यांनी तिला घेऊन कंधार येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकरणाची माहिती माळाकोळी पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयात जावून तिचा जवाब घेतला. उपचार झाल्यानंतर कौशल्याबाई लक्ष्मण केंद्रे यांनी माळाकोळी (ता. लोहा) पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी चोरट्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्री. गिते करीत आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तपासीक अमलदार तथा सहाय्यक फौजदार श्री. गिते यांनी तपास सुरु असून लवकरच आरोपीला अटक करण्याचा विश्‍वास व्यक्त केला.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital King of Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Horoscope : उद्या राम नवमीला बनतोय दुर्मिळ योग! पुढचे 6 दिवस 'या' 3 राशीच्या लोकांना हमखास धनलाभ; एका रात्रीत आयुष्यात घडेल मोठी घटना

Latest Marathi News Live Update : अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा विद्यार्थिनीवर हल्ला

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीरला Sharad Pawar यांच्याकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती; काका पवारांच्या तालमीला ५० लाख

Ashok Kharat: ‘कर्मकांडां’ची लांबलचक यादी! नाशिकचा भोंदू बाबा इंटरनेटवर ट्रेंडिंग; अशोक खरात केसने गाठली गुगल टॉप सर्च कॅटेगरी

SCROLL FOR NEXT