वालसावंगी : शेतीकामात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना महिला. 
मराठवाडा

ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाकडे अग्रेसर

विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) - चूल व मूलच्या तत्त्वाला बाजूला सारत ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाकडे अग्रेसर होत आहेत. शेती, शिक्षण, वैद्यकीय, बचतगट, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत महिलांची वाटचाल त्याची साक्ष देत आहेत. 

शेतात महिलांची मोलाची साथ 

शेतीच्या कामात महिलांची मोलाची साथ नेहमीच राहिलेली आहे. कापूस वेचणे, मिरची तोडणे, खत देणे, पिकाला पाणी पुरविणे, पिकांची सोंगणी, कापणी करणे, निंदणी करणे अशी अनेक कामे महिला ग्रामीण भागात हिरिरीने करताना दिसून येतात. 

शेतातील हिशेबदेखील महिलांच्या हातात

शेतातील मजुरांचा हिशेब, त्यांची मजुरी देणे, आठवडाभरचा शेतातील कामाचा ताळेबंद ठेवणे, मुलाच्या शैक्षणिक गोष्टीचा हिशेब, किराणा हिशेब, आठवडे बाजार करणे, भविष्याच्या दृष्टीने काटकसर करणे आदी कामे सुद्धा महिला करतात. 

बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम 

वालसावंगी येथे महिलांचे जवळपास १०० बचतगट कार्यरत असून, सुमारे १ हजार महिलांचे जाळे विणले गेले. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम होत आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर सक्षमरीत्या उभ्या राहत आहेत. 

व्यवसायातही ठसा 

ग्रामीण भागात शिलाई मशीन चालविणे, कापड, किराणा दुकान चालविणे, जनरल स्टोअर्स, पापड निर्मिती करणे, पीठ गिरणी चालविणे आदी कामांतून ग्रामीण भागातील महिला व्यवसायातही ठसा उमटवीत आहेत. 

राजकीय क्षेत्रात प्रभावी कार्य 

वालसावंगी येथे सर्वच महत्त्वाच्या पदांवर महिलाराज आहे. अगदी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, अनेक ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती अध्यक्ष अशा विविध पदांवर महिला विराजमान आहेत. या माध्यमातून ग्रामसभा, तसेच विविध सभांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न मांडत असून, सभा गाजवीत आहेत. 

ज्ञानदानाच्या कामातसुद्धा अग्रेसर 

राजकीय, सामाजिक क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा महिलांचा मोठा सहभाग वाढला आहे. गावातील विविध शौक्षणिक क्षेत्रांत शिक्षिका म्हणून अनेक महिला ज्ञान देण्याचे कार्य करीत आहेत. याचबरोबर अंगणवाडी सेविका म्हणून त्या महत्त्वाचे कार्य करीत आहेत. 

वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक 

वालसावंगी परिसरातील अनेक गुणवंत विद्यार्थिनींनी अभ्यासाच्या बळावर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला. अनेकींनी वैद्यकीय शिक्षण नुकतेच पूर्ण केलेले आहे. परिचारिका, आशा स्वयंसेविका या माध्यमातूनसुद्धा महिलांचे कार्य सुरू आहे. अनेकींनी वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळविलेला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

SCROLL FOR NEXT