Nanded News 
मराठवाडा

Video : घरातल्या जगातच दडलीय तुमची आवड, काय म्हणतात डाॅ. नंदकुमार मुलमुले

शिवचरण वावळे

नांदेड : लॉकडाउनमुळे जवळपास सर्वच नागरिक घरातच बसून आहेत. त्यामुळे अनेकजण अक्षरशः वैतागून गेले आहेत. त्यामुळे आनंदी जीवन जगण्यासाठी, तसेच आपली आवड जोपासण्यासाठी प्रयत्न करणे हाच त्यावर एकमेव उपाय असून, आपली आवड घरातच दडून बसली आहे. त्याचा शोध घेतल्यास निश्‍चितच लॉकडाउमध्ये आनंद घेता येईल, असा विश्‍वास मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी ‘ई-सकाळ’च्या वाचकांना दिला आहे.

सध्याच्या लॉकडाउनमध्ये मन संतुलित कसे ठेवायचे, भीतीमय वातावरणात मन शांत कसे ठेवायचे आणि मनावर ताबा कसा मिळवायचा, इतकेच नव्हे तर ‘कोरोना’पासून मुक्ती कशी मिळवायची ही सहज भावना आहे. ती सर्वांच्याच मनात असते. भीती ही मनाचे संरक्षण अस्त्र आहे. भीतीमुळे मनुष्य सावध होतो. भयाची भावना जेव्हा मूळ संकटापेक्षा मोठी होते, भीतीची गरज नसताना भयाचा मनाने ताबा घेतल्यावर भय हे संकटासमोर कमकुवत ठरते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी करते. तेव्हा भयावर ताबा मिळवायला पाहिजे.  
 
अज्ञानाची जास्त भीती
कुठलेही युद्ध एकाकी मैदानावर होत नाही. तर सर्वप्रथम या युद्धाची सुरुवात त्या व्यक्तीच्या मनात सुरु होते. मनात युद्ध हरलेली व्यक्ती मैदानावर कधीच युद्ध जिंकु शकत नाही. सध्याच्या घडीला प्रत्येक भारतीयांना आपला शत्रू कोण आहे याबद्दल माहिती झाली आहे. त्यामुळे आम्ही युद्ध हरणार नाही. कारण आमचा शत्रू हा शरिरात प्रवेश करणार नाही. कारण त्याची दोन वाहने आहेत. डोळे, तोंड आणि नाक या तिन्ही प्रवेशद्वारावर आमचा स्पर्श होणार नाही, इतकी काळजी आम्ही घेऊ शकतो. 

मनाचे कोपरेही उजळतील
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवरुन लक्षात येते की, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, मृत्यूची शक्यता ही दीड ते दोन टक्के इतकी आहे. यासाठी तुम्हाला सतत कामात रहावे लागणार आहे. त्यासाठी तुमचे घर हे मोठे जग आहे. त्यात अनेक गोष्टी तुमच्या आवडीच्या दडलेल्या आहेत. त्या वस्तूंचा शोध घ्या तेव्हा तुमच्या आवडीच्या वस्तूच उजळणार नाहीत तर, तुमचे मनच नव्हे तर, तुमच्या मनाचे कोपरेसुद्धा उजळलेले असतील. जेव्हा तुम्ही कामात व्यग्र रहाल तेव्हा तुमच्या मनास कोणता भयाचा लवलेश सुद्ध येणार नाही. तुमची सकारात्मक ऊर्जा वाढलेली असेल. कलेची जोपासणा करा, गायन, वादनात देहभान विसरुन रममान व्हा, असा मंत्रही डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी खास ‘ई-सकाळ’च्या वाचकांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT