Latur Accident News esakal
मराठवाडा

Latur Accident | अहमदपुरात कारच्या धडकेत तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

मुकिंद याने डी.फार्मसीचे शिक्षण घेतले होते.

रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील दगडवाडीजवळ कारच्या धडकेत एक ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.१५) घडली. दगडवाडी येथील मुकिंद रामराव मुंडे (वय २४ ) व प्रतीक पांडुरंग मुंढे (२१) हे दोघे मित्र नेहमीप्रमाणे सकाळी व्यायामासाठी निघाले. गावापासून काही अंतरावर असलेल्या पुलाच्या कठड्याजवळ पोहोचले असता अंबाजोगाईकडून अहमदपूरकडे (Ahmedpur) येणाऱ्या कारने या दोघांना धडक दिली. यात मुकिंद रामराव मुंडे हा जागीच ठार, प्रतिक पांडुरंग मुंडे गंभीर जखमी झाला आहे. (Youth Died In Accident, One Man Injured In Ahmedpur of Latur)

जखमीस पुढील उपचारासाठी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कारचालक वसीम याकूब शेख (रा.अहमदपूर) याच्याविरुद्ध किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड व पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. (Latur)

होतकरु तरुण

मुकिंद मुंडे याचे शिक्षण डी.फार्मसी झाले होते. एक वर्षापासून किनगाव येथील औषधी दुकानात तो अनुभवासाठी काम करीत असलेल्या मुकिंदचा दोन दिवसांनी साखरपुडा होणार होता. प्रतिक मुंडे हा पदवीधर आहे. आसाम रायफलची तो तोंडी व लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला असून लवकरच त्याला नियुक्ती पत्र मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT