file photo
file photo 
मराठवाडा

या जिल्हा परिषदेच्या सत्तेत आता दोघात तिसरा

नवनाथ येवले

नांदेड :  राज्यातील राजकीय सत्तापटलावरील घडामोडींचा सथानिक स्वराज्य संस्थामधे होवू घातलेल्या घातलेल्या निवडीवर प्रभाव पडत आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून दर्जा प्राप्त असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी कॉग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेत आता शिवसेना या तिसऱ्या पक्षाचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. संख्याबळाचे साम्य राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात जिल्हास्तरावरील पडझडीतून एकसारखेपनाचा योगायोग आल्याने वजनदार समित्यांसाठी दोन्ही पक्षाच्या सदस्यांची पक्षश्रेष्ठींकडे लॉबींग सुरु झाली आहे.


राज्याच्या सत्ताकारणाचे गणीत जवळपास उलगडल्यात जमा आहे. महाआघाडीने शिवसेनेची सोबत महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापन केल्याचा प्रभाव राज्याप्रमाणे जिल्ह्याच्या राजकारणातही पडणार आहे. जिल्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील सत्ताकारणामध्ये याचा शिरकाव होणार असल्याचे चित्र स्पष्ठ झाल्याने सत्ताधारी पक्षात महत्वाच्या पदांसाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबींग सुरु झाली आहे. जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव सुटल्याने सत्ताधारी कॉग्रेसकडून दावेदारांच्या चाचपणीपूर्वीच पदाधिकाऱ्यात दावे प्रतिदाव्यांचे पेव फुटले आहे. दरम्यान सत्ताधारी कॉग्रेसकडे अध्यपदासाठी एकून पाच दावेदार असल्याने अध्यपदाचा बहूमान मतदारसंघाला मिळाण्यासाठी आजी-माजी आमदार, पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच सुरु झाली आहे.

एकून ६३ च्या संख्याबळा पैकी कॉग्रेस- राष्ट्रवादीकडे ३८ एवढे बहूमताच्य पलिकडे संख्याबळ आहे. पण विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाप्पुसाहेब गोरठेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजेश देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे चार ने संख्याबळ घटले. दुसरीकडे माजी आमदार प्रदिप नाइक, शंकर धोंडगे हे पक्षनिष्ठेशी कायम राहील्याने राष्ट्रवादीच्या दहा पैकी सहा एवढ्या संख्याबळाचा आकडा जानकारांकडून ग्राह्य धरला जात आहे. शिवसेनेच्या दहा पैकी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचे चार सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळाचे साम्य पडझडीतही योगायोगाने समान राहील्याने राष्ट्रवादी- शिवसेनेच्या गोटात वजनदार समित्यांसाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबींग सुरु झाली आहे. \

अध्यक्ष निवडीच्या वादीळी चर्चेत आता जिल्हा परिषदेतील भावी समिती प्रमुखांची चर्चा रंगू लागल्या आहे. शासनस्तरावरुन अध्यपदाची आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली असली तरी अद्याप निवडीची मुदत ठरविण्यात आली नाही. त्यातच जिल्हास्तरावरुन पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रीया जाहिर नसल्याने जिल्हापरिषद अध्यक्षपदाची निवड डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी पर्यंत लांबणीवर पडणार आहे. तालुकास्तरावर पंचायत समितीच्या सभापदी पदाच्या आरक्षण सोडतीची तर जिल्हा परिषदेत आध्यक्ष निवडीची उत्सुकता वाढली आहे.


पक्षीय बलाबल
कॉग्रेस - २८
भाजप- १३
राष्ट्रवादी- १० पैकी बाप्पुसाहेब गोरठेकर गट- ०४
शिवसेना- १० पैकी खासदार प्रताप पाटील चिखलीकर गट- ०४
रासप- ०१
अपक्ष- ०१
एकून - ६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT