photo 
मराठवाडा

कोरोना विरोधात लढ्यासाठी झेडपीच्या उपाध्यक्षाचे योगदान 

नवनाथ येवले

नांदेड : लॉकडाऊनमुळे प्रत्येक नगारीक घरात बसुन कोरोनाशी दोन हात करीत आहे. आरोग्य यंत्रणेसह पॅरामेडिकल विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रीचा दिवस करुन राबत आहेत. कोरोना विरोधात लढ्यासाठी दानशुर व्यक्ती पुढे येत आहेत. राज्यभरातून सामाजीक संस्था, शासकीय अधिकारी, कर्मचारी आपापल्या परिने योगदान देत आहेत. कोरोना विरोधात लढ्यासाठी सामाजीक बांधीलकी जोपासत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा अर्थ व आरोग्य सभापती पद्मा सतपलवार यांनी शुक्रवारी (ता.२७ मार्च २०२०) एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री साह्यता कक्षाकडे सुपुर्द केले आहे. 

देशातील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारला मदतीचा हात देण्यासाठी देशभरातून दानशुर व्यक्ती सरसावत आहेत. कोरोना विरोधात लढ्यासाठी सामाजीक संस्था, व्यक्ती, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामाजीक बांधीलकीचे योगदान केले आहे. शिवसेनेचे धर्माबाद तालुका प्रमुख अक्षय रेड्डी यांच्या पुढाकाराने त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा अर्थ व आरोग्य सभापती पद्मा सतपलवार यांनी सामाजीक बांधीलकी जोपासत कोरोना विरुद्ध लढ्यासाठी एक महिन्याचे मानधन दिले. शुक्रवारी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे त्यांनी मानधनाची रक्कम वर्ग केली. 

सौ. सतपलवार यांचे योगदान मोलाचे 
कोरोना विरोधात लढ्यासाठी सामाजीक संस्थासह दानशुर व्यक्ती पुढे येत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री, आमदारांनी मदत जाहिर केली. त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावरील स्वायत्ता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही उपाध्यक्षा सौ. सतपलवार यांची प्रेरणा घेवून मदतीसाठी पुढे यावे. कोरोना विरोधात लढ्यासाठी योगदान देणाऱ्या जिल्हा परिषदेत उपाध्यक्षा सौ. सतपलवार या पहिल्या पदाधिकारी ठरल्या आहेत.  

येथे क्लिक करा - Video : कोरोना मला स्पर्शही करू शकत नाही, असं कोण म्हणतंय ते वाचाच
 
शिक्षक संघटनेचे आवाहन 
जगभरात कोरोना या राष्ट्रीय आपत्तीने थैमान घातले असून संसर्ग रोखण्यासाठी आपला देश लॉकडाऊन आहे. देशासह राज्यावर कोसळलेल्या कोरोना विरुद्धचा लढा आपण जिंकणारच आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे यद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशावर कोसळलेल्या संकट समयी आपलीही काही सामाजीक जबाबदारी आहे. देशाचे नागरीक म्हणून आपनही काही समाजाचे देणं लागतो या उदात्त भावनेतून शिक्षक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यानी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT