मुक्तपीठ

जळगावचं गांधीतीर्थ

अविनाश देशपांडे

जळगावची टेकडी हिरवी होत गेली आणि तिथेच समृद्ध अनुभव देणारे गांधीतीर्थही उभे राहिले. महात्मा गांधींजींची छोटीशीही कृती विचार करायला भाग पाडते. त्यांनी व्यक्त केलेले विचार तुम्हाला चिंतन करायला लावतात. ते आठवत गांधीतीर्थावर फिरताना शांतीचा अनुभव येतो.

'फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश', असाच काहीसा अनुभव नुकताच जळगाव येथील गांधीतीर्थावर फिरताना घेतला. सामाजिक बांधीलकी जपणारे हे शहर बघून अभिमानाने ऊर भरून आला. जळगाव. तिथे जाऊन काय बघणार, असा प्रश्न मला व माझी पत्नी गौरी हिला पडला होता. "अमृतयात्रा' या प्रवासी कंपनीबरोबर "सामाजिक पर्यटना'साठी आम्ही जळगावला गेलो होतो. अजंठा येथील लेणी बघून जळगावला गेला.

गांधीतीर्थचा परिसरच विलक्षण आहे. एका टेकडीवजा भागांत विविध प्रकारच्या झाडांनी, वेलींनी बहरलेला परिसर. आंबा, गुलमोहर, कडुनिंब, विविध रंगांचे बोगनवेल व आणखी बऱ्याच प्रकारचे वृक्ष या ठिकाणी डोलताना दिसतात. (कै.) भवरलाल जैन यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय उद्योग समूह येथे बघावयास मिळतो. फळांवर प्रक्रिया करणे, कांदा निर्जलीकरण, केळीच्या झाडांची टिश्‍युकल्चर माध्यमातून रोपे तयार करणे, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, शेतीची अवजारे बनविणे, बायोगॅस निर्मिती, ठिबक सिंचन, झाडांसाठी खत बनविणे अशा विविध विषयांचे ज्ञान व प्रात्यक्षिक बघायला मिळाले. सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी छोटी-छोटी पण अर्थपूर्ण वाक्‍ये दिसतात, जसे की - "छोटे छोटे कदम, आसमॉं छूने का दम', "किसान की मुस्कान हमारा लक्ष्य', "आमरस खिलाओ, खुशीया मनाओ'. इंग्रजीतील एक वाक्‍य मला खूपच आवडले - "Our small ideas like the little drops of water, that make mighty ocean Make Big Revolutions'. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील गांधीतीर्थ. महात्मा गांधींचा जीवनप्रवास माहिती, चित्रपट, चित्र व पुतळे यांच्या माध्यमातून उलगडून दाखवणारे अद्ययावत वातानुकूलित म्युझियम येथे आहे. म्युझियम बघितल्यावर एक जिवंत इतिहास डोळ्यांपुढे तरळतो. महत्त्वाचे म्हणजे येथे अभ्यासिका आहे. गांधीजींसंदर्भात आणि त्यांना आवडणाऱ्या विषयातील अनेक मोलाचे ग्रंथ येथे आहेत. एखाद्या अभ्यासकाला त्याच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर अभ्यास करायचे असेल, तर येथे अभ्यासकांसाठी आरामदायी खोल्याही आहेत. अभ्यासकांनी यावे व येथे निवांत अभ्यास करीत बसावे, अशी गांधीतीर्थची उभारणी करणाऱ्यांची इच्छा आहे.

जळगावातील आर्यन इको रिसॉर्टही भावले. निसर्गावर, पर्यावरणावर निस्सीम प्रेम करणाऱ्या महाजन दांपत्याच्या कल्पक ध्येयातून उजाड माळरानावर फुललेले हे नंदनवन आहे. पेशाने दोघंही डॉक्‍टर आहेत. पण प्रेमापोटी काही हजार झाडे, वेली रुजवून काढल्या आहेत. सर्वांत वरचढ म्हणजे या परिसरात व नैसर्गिक पाण्याचे स्रोत, झरे अडवून तयार केलेल्या तळ्याभोवती असलेल्या वातानुकूलित तंबूत वास्तव्य! अहाहा! महत्त्वाचे म्हणजे इथे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना मुबलक प्रमाणात मिळणारा प्राणवायू. ज्यांना शुद्ध हवेची सवय नसेल त्यांना श्वसनास त्रास होऊ शकेल, इतकी शुद्ध हवा. सकाळच्या प्रहरी या आवारातील फेरफटका म्हणजे भारद्वाज, कोकीळ, बुलबुल, पोपट व रंगीबेरंगी पक्षी यांना मनसोक्त बघण्याची, त्यांचा किलबिलाट ऐकण्याची संधी. आवारातील "मस्ती की पाठशाला' भागांत लहानपणी केलेल्या उनाड खेळांची उजळणी करण्याची संधी. आवारात पेरूची बाग, बांबूचं बन, असंख्य विविध फुलांची झाडं, वेली, वेगवेगळ्या प्रकारची 'कॅक्‍टस', मोकळे प्रशस्त मैदान, हिरवेगार गवताचे आवार. महाजन दांपत्यांचे आदरातिथ्य म्हणजे लोप पावणाऱ्या संस्कृतींची आठवण असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT