muktapeeth 
मुक्तपीठ

अमृतानुभव

दत्ता टोळ

आयुष्यात अनेक अनुभव येतात चांगुलपणाचे. मदतीचा हात पुढे झाल्याचे. संधी मिळाली की आपणही चांगुलपणाने वागायला हवे. आपण भलेपणाने वागले की जगही तसेच वागेल या विश्‍वासाने चालायला हवे.

ना खेडे ना शहर अशा बार्शी (टाउन) गावातून मी विशेष गुणवत्तेसह एस.एस.सी. उत्तीर्ण झालो. पुण्याच्या बी.एम.सी.सी. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. घरची परिस्थिती साधारण. आईने शिक्षणासाठी चार वर्षांच्या खर्चाची बेगमी करून ठेवली होती. गरजू विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी महाविद्यालयाने अर्ज मागवले होते. मी अर्ज केला अन्‌ एके दिवशी सवलतीच्या यादीत मला शंभर टक्के सवलत मिळाल्याचे जाहीर झाले. मला आनंद झाला. पुढे दुसऱ्या सत्रासाठी फक्त साठ टक्के सवलत मिळाली. मी धाडसाने प्राचार्यांच्या कक्षात गेलो. प्राचार्य होते टी. एम. जोशी, ख्यातनाम कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांचे पुतणे. त्यांनी विचारले, ""कशाला आलात? काय काम आहे?'' मी उत्तर दिले, ""सर, या वेळी मला फक्त 60 टक्के सवलत मिळाली आहे.''
""गेल्या वर्षी किती मिळाली होती?''
""शंभर टक्के.''
""त्यावेळी परीक्षेत किती टक्के गुण मिळालेले होते?''
""एकाहत्तर टक्के.''
""यंदा प्रथम वर्षाला किती टक्के?''
""एकाहत्तर टक्के.''
""मग बरोबर.''
""सर, पण माझी अडचण आहे.''
""टोळ, तुम्ही माझ्या पदरात धो धो मार्क्‍स टाका. मी धो धो पैसे देईन. तरीसुद्धा निमशहरी खेड्यातील एक मुलगा धाडस करून माझ्या चेंबरमध्ये आला म्हणून या खेपेला मार्क्‍स कमी असतानासुद्धा मी तुला पूर्ण सवलत देतो. पण लक्षात ठेव, भरपूर गुण मिळवलेस तरच ही सवलत चालू राहील.''
सरांचे आभार मानून मी निरोप घेतला. धो धो मार्कांबद्दलचे सरांचे विधान मी कायम मनावर कोरून ठेवले.
000

नगरच्या बालकुमार साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष. पुस्तकांचे स्टॉल सजले होते. बालकुमार साहित्य संमेलनाच्या स्टॉलवर कोणतेही पुस्तक दहा रुपयांस दिले जात होते. एक चुणचुणीत मुलगी धावत माझ्याजवळ आली. ""सर, माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत. पाच रुपये देता का? मला पुस्तक विकत घ्यायचे आहे,'' मुलगी भरभर बोलत होती. मी खिशाच्या पाकिटातून दहा रुपयांची नोट काढली व तिला म्हटले, ""हे घे दहा रुपये. बालकुमार साहित्य संस्थेच्या स्टॉलवरून पुस्तक घे. मुलगी नोट घेऊन पळत गेली व परत पळत आली. आता तिच्या हातात एक पुस्तक होते अन्‌ दुसऱ्या हातात पाच रुपयांची नोट. ती नोट पुढे करीत म्हणाली, ""सर, हे घ्या तुमचे पाच रुपये.''
""पैसे! ते कशासाठी परत करते आहेस?''
""तुम्ही सांगितेल्या स्टॉलवर पाच रुपयांत पुस्तक मिळाले.''
""राहू दे ते पैसे तुला. पुन्हा त्या स्टॉलवर जा अन्‌ त्या पैशांतून तुला आवडेल ते दुसरं पुस्तक घे.''
आनंदाने उड्या मारीत नवीन पुस्तक खरेदी करायला ती मुलगी हसत, उड्या मारीत निघून गेली. धावत निघालेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा लाख मोलाचा आनंद मी अनुभवत होतो.
000

मी नातू फाउंडेशनचा प्रमुख विश्‍वस्त. एके दिवशी सकाळी शाळकरी मुलगा आला. डोळे पाण्याने भरलेले. तो मुलगा म्हणाला, ""आजोबांनी पाठवले. मला नागपूरच्या कॉलेजची फी भरायची आहे. एक हजार रुपयांची गरज आहे. आपल्या फाउंडेशनमधून पैसे मिळतील ही अपेक्षा.'' मी म्हटले, ""बरे झाले, तू आजच आलास. दुपारी तीन वाजता ट्रस्टची मीटिंग आहे. ट्रस्टच्या नावे अर्ज लिहून दे आणि दोन दिवसांनी सकाळी आठ वाजता ये.''
ठरल्या दिवशी सकाळी ठीक आठ वाजता डोअर बेल वाजली. मी दार उघडले. तो मुलगा हजर. "ये' म्हणत त्याचे स्वागत करून त्याच्या हाती मी हजार रुपयांचा धनादेश दिला. तो घेऊन रडत रडत त्याने मला दंडवत घातला. तो का रडतो आहे, मला कळेना. त्याचं रडणं थांबल्यावर मी विचारलं, ""तुला हजार रुपये हवे होते. ते मी दिले. मग तू रडतोस का?''
स्फुंदत तो बोलू लागला, ""काय सांगू सर, आजपर्यंत आजोबांच्या ओळखीच्या अनेकांच्या घरांचे दरवाजे ठोठावले. प्रत्येकाने टोलवाटोलवी केली. तुम्हीदेखील असेच काही म्हणाल अशी मनाशी खुणखाठ बांधली होती. पण तुम्ही त्याला अपवाद ठरला अन्‌ माझ्या हाती चक्क मदतीचा चेक दिलात. म्हणून मी भारावलो अन्‌ कृतज्ञता म्हणून दंडवत घातला.''

असा अमृतानुभव मी असंख्य वेळा घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Minister Statement : ''राजकीय गरज म्हणून जाहीर केल्या अनेक योजना; आता पूर्ण करणं कठीण'', भाजप मंत्र्याची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ!

Satej Patil : 'दोरी तुटली, आता बांध ही स्वतंत्र झाले'; हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले सतेज पाटील?

Budh Gochar 2025: वर्षातील शेवटचे गोचर 'या' 3 राशींचे भाग्य बदलू शकते, जीवनात दिसून येतील अद्भूत बदल

Shalinitai Patil: 'शालिनीताई पाटील यांना अखेरचा निरोप'; सातारारोड येथे अंत्यसंस्कार, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण!

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तुमच्या शहरातील ताजा भाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT