muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

पोटात कावळे अन्...

ज्योती देवळालीकर

हॉटेलच्या वेटिंगमध्ये थांबले असताना चमचमीत पदार्थांबरोबर अनेकविध प्रश्‍नांनी मनात गर्दी केली. तेवढाच छान टाइमपास झाला.

त्या दिवशी, कामाला बाई येणार नव्हती. एकच बाई धुणीभांडी, झाडू-पोशा करून पोळ्या करून द्यायची,
"बाई आज येणार नाही, आपण बाहेर जाऊ, हिंडू फिरू खाऊन घरी परत येऊ,' असे ह्यांना स्पष्ट सांगितल्यास आपल्या आळशीपणाची जाहिरात केल्यासारखे होते. म्हणून मी युक्ती करते. कधीकधी ह्यांना हॉटेलचा मूड येतो ना तेव्हा ते, "बोल तुला कोठे जायचे, त्या हॉटेलात नेतो,' अशी आश्‍वासने हे देत असतात. तेव्हाच मी कैकयीसारखा तो वर ठेवणीत ठेवते व पुन्हा कधीतरी जाऊ आज तुमच्या आवडीचे.....वगैरे वेळ मारून नेते. मग बाई येणार नसली की मंथरेसारखे सकाळपासून... "आपण किती दिवसात हॉटेलात गेलो नाही, त्या हॉटेलबद्दल परवाच ऐकलं, ती अमकी तमकी फारच हॉटेलिंग करते बाई, ते नवे नाव ऐकले का?' असे बोलत ह्यांच्या मनात सकाळपासून हॉटेलचा मूड भरवत बसते.

त्या दिवशी ह्यांनी कोठे जाऊयात? विचारल्यावर एका क्षणात मनात विचार केला, आज नेहमीची मर्यादित अंतराची कक्षा वाढवायला हवी. एक वाजता फर्ग्युसन रोडवर गेलो. हॉटेलच्या थोडं जवळच, एके ठिकाणी यांना एक काम होते, म्हणून मला खाली उतरायला सांगून "पाच मिनिटांत येतो, तू तेथे नंबर लाव म्हणाले.' रस्ता क्रॉस करून पाच मिनिटांत हॉटेल होते. मी चालेल म्हणत रस्ता क्रॉस करू लागले; पण जाताच येईना! इथून तिथून, वेगातली वाहने हॉर्न वाजवत, ब्रेक दाबत, मिळेल ती इंच इंच जागा जिंकत वेडीवाकडी, तिरकी तारकी येत होती. मला कणभरपण पुढे जाता येत नव्हते. हे ओरडले, ""गर्दीला न घाबरता कर क्रॉस रस्ता. नाहीतर दोन दिवस थांबलीस तरी येथेच असशील.' माझी असहाय्यता बघून, चल, येतो सोडायला म्हणाले, ""मी यांचा हात घट्टात घट्ट पकडत मूठ आवळली व दुसऱ्या हाताच्या मुठीत माझा जीव ठेवत तीही घट्ट आवळत निघाले.
हे मला पैलतीरावर सोडून, ""आता तरी जाशील का सरळ?'' असे म्हणाले, पुढे मी व्यवस्थित गेले.

हॉटेलच्या आतबाहेर ही गर्दी. वेळेचा अंदाज घेतला. माझी भूक चमचमीत पदार्थांच्या वासांनी चाळवली जात होती. बाहेरच्या कलकलीकडे दुर्लक्ष करून लक्ष डोक्‍यातल्या विचारांकडे वेळीच न्यावे, काही सकारात्मक विचारांचे खाद्य डोक्‍याला देता येते का ते बघावे म्हणत असताना झटकन मनात आले आणि प्रश्‍नच सुटला म्हणा ना. मग काय मुलाला आजच फोन करून सांगू या का? अमेरिकेत दुसऱ्या कुणाची चाकरी करत बसण्यापेक्षा येथे हॉटेलची मालकी का नाही घेत? कित्ती छान चालेल हॉटेल! मुख्य म्हणजे भूक मरेपर्यंत वेटिंग नाही व रहदारीचे भय नाही, आपल्याच भागांत असेल ना हॉटेल! काही वेगळे पदार्थ ठेवले तर? काय काय ठेवू या? विचारांनीच माझे पोट भरू लागले. हॉटेलचे इमल्यावर इमले मनात चढवत असताना टेबल मिळाल्याची खबर आली व हेपण आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT