HomeLearning
HomeLearning 
मुक्तपीठ

लर्न फ्रॉम होमची आवश्‍यकता आणि भवितव्य

ललितकुमार बारसागडे 7875127885

लर्न फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यासाठी विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्याचा विविध लर्निंग पोर्टलचा, शैक्षणिक ऍपचा आढावा आपण मागील भागात घेतला. मात्र, किती शिक्षक प्रत्यक्षात त्यांच्या विद्यार्थ्यांना या सर्व साहित्याचा लाभ करून देताहेत? ही संकल्पना राबविताना येणाऱ्या अडचणी, मर्यादा आणि विविध आव्हाने तसेच लर्न फ्रॉम होमची आवश्‍यकता आणि भवितव्य या बाबींचा आपण आज वस्तुनिष्ठपणे विचार करणार आहोत.
आपल्या शिक्षण व्यवस्थेत एक मोठी दरी निर्माण झाल्याचे आपण बघतोय. एकीकडे शाळेच्या अभ्यास आणि शिकवण्यापलीकडे अगदी नर्सरीपासून कोचिंग क्‍लासची सुविधा असणारे विद्यार्थी आहेत तर दुसरीकडे अगदी दहाव्या वर्गापर्यंत कुठल्याही कोचिंग क्‍लासला न जाता केवळ शाळेतील शिकवण्यावर अवलंबून असलेले विद्यार्थीही आहेत. आज बाजारात विविध कंपन्यांचे लर्निंग पॅकेजेस उपलब्ध आहेत. परंतु, ते सर्वसामान्यांना किमतीमुळे परवडणारे नाहीत. शाळा डिजिटल केल्यामुळे आणि शिक्षक तंत्रस्नेही झाल्यामुळे या विविध ऑनलाइन लर्निंगचा वापर शाळांना नवीन नाही. मात्र, याचे प्रमाण किती? हा शोधाचा विषय आहे. आमची मुले कॉन्व्हेंटला असल्याने आज ऑनलाइन अभ्यासक्रम शिक्षकांनी दिला नाही याची चिंता करताना आपण विद्यार्थ्यांना लर्न फ्रॉम होममध्ये किती शिकवतोय याची काळजी असू नये का?
ग्रीष्मकालीन सुट्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण देऊ नये अशी भूमिका घेणाऱ्या शिक्षकांनी स्वत:हून लॉकडाउन नंतर लर्न फ्रॉम होमकरिता पुढाकार का घेतला नाही? किंवा शिक्षणाधिकारी कार्यालय आणि जिल्हा प्रशिक्षण संस्था यांनी लर्न फ्रॉम होम सुरू करायच्या सूचना केल्यानंतर त्याचे लगोलग पालन करणारे शिक्षक किती? गंमत अशी आहे की आमच्या अडचणींचा पाढा फार लांब असतो. अडचणींवर मात करण्याची आमची तयारी नसते. ग्रामीण भागात स्मार्टफोन नसतात, असेल तर डेटा नसतो तेही असले तर कव्हरेज नसते आणि या सर्व गोष्टी असल्या तर पालक मुलांच्या हातात मोबाईल द्यायला तयार नसतो अशी नेहमीची कारणे सांगितली जातात. मात्र, वस्तुस्थिती काय आहे...? आज किमान साठ टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत, स्मार्टफोन असलेली व्यक्ती एकदाचा अन्नावाचून जगेल पण डेटावाचून राहू शकत नाही. आणि सरसकट कव्हरेज राहत नाही ही शक्‍यता आजघडीला मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे दुर्मीळ झाली आहे. अभ्यासाच्या आणि शिक्षणाच्या नावावर आज पालक वाट्टेल ते करायला तयार होतात. अशा वेळेस लर्न फ्रॉम होमसाठी किमान दोन तास मोबाईल मुलांच्या हाती पडणे सहज शक्‍य आहे. मुळात आम्हाला आमचीच मानसिक तयारी किती हे प्रामाणिकपणे तपासण्याची गरज आहे. तंत्रस्नेही शिक्षक बनायच्या नावावर जर आपण केवळ सोशल मीडिया वापरणे शिकले असू तर खऱ्या अर्थाने तंत्रस्नेही शिक्षक बनण्यासाठी आपल्याला थोडे परिश्रम घ्यावे लागतील. कारण तंत्रस्नेही शिक्षकांनी कारणे किंवा अडचणी न मांडून त्यावर मात करून केव्हाच कामाला सुरुवात केली आहे. आम्ही मात्र अजूनही पळवाटा शोधत बसलोय, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
पालक सहकार्य करीत नाहीत, ही बाब जरा वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण शिक्षक जर "आउटपुट' देत असतील तर केवळ पालकच नाही तर उभा गाव त्या शिक्षकासोबत सहकार्यासाठी उभा ठाकतो. आजघडीला शिक्षक-पालक ही नाळच कमजोर झाली आहे. बाकी वेळेस पालकांच्या संपर्कात जर आपण नसू, पाल्याच्या अभ्यास आणि प्रगतीबाबत जर आपण पालकांशी संवाद साधत नसू तर पालक एकदमच लर्न फ्रॉम होमसाठी तयार होतील ही अपेक्षा चुकीची आहे. नियमित शाळा सुरू असताना जर आपले अध्यापन अनियमित असेल तर पालक लर्न फॉम होमच्या वेळेला अपव्यय समजून टाळणार, हे निश्‍चित.
लर्न फ्रॉम होम केवळ नावापुरते नको तर त्यातील गुणवत्ता ही तेवढीच महत्त्वाची आहे. आज शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशिक्षण संस्थांनी यांनी सुरू केलेल्या बऱ्याचशा लर्न फ्रॉम होममध्ये विविध चाचण्यांवरच जास्त भर दिल्याचे लक्षात येते. या चाचण्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांनी सोडविलेल्या विविध चाचण्या तपासून घेणे असा एकसूत्री प्रकार निदर्शनास येतो. यात शिकविण्याचा प्रकार अल्प आणि चाचणी आणि तपासणी याचा भडिमार जास्त आहे. आज राज्य शासनाचे अधिकृत दीक्षाऍप आहे. त्यावरील कंटेंटची गुणवत्ता सुधारण्याची अजून गरज आहे असे वाटते.
आज लर्न फ्रॉम होमची खरंच गरज आहे. कोरोनामुळे शाळा नेमक्‍या केव्हा उघडल्या जातील आणि कोणत्या परिस्थितीत शिक्षण दिले जाईल, याबाबत अद्यापही स्पष्ट चित्र नाही. अशा वेळेस लर्न फ्रॉर्म होम आपल्या मदतीला धावून येईल. विविध साधनांचा वापर करून अध्यापन सचैत करता येते हा लाभ या संकल्पनेचा आहे. आज जे पालक तयार नसतील त्यांची मानसिकता आपल्याला बदलवावी लागणार आहे. आज घडीला जिथे 150 रुपयांपर्यंत डेटा महिनाभरासाठी विकत घेता येतो तिथे रोजचे पाच रुपयाप्रमाणे खर्च करण्याची कुवत पालकांची नक्कीच आहे. आणि सर्वच भार केवळ पालकांवर देण्यापेक्षा शासनाने शिक्षणावरील खर्च वाढवून आता शाळा खऱ्या अर्थाने डिजिटल बनविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लर्न फ्रॉर्म होममध्ये जरी वर्गखोलीतल्या शिक्षणाचा अनुभव नसला तरी काही प्रमाणात ही प्रक्रिया आपण आनंददायी नक्कीच करू शकतो. मग त्यासाठी आधी आम्हाला व्हिडिओ मिटिंगसारख्या संकल्पनेवर काम करावे लागेल.
लर्न फ्रॉम होमचा मार्ग काहीसा अडचणीचा नक्कीच आहे. मात्र, कठीण आणि अशक्‍य मुळीच नाही. आपला सकारात्मक दृष्टिकोन बराचशा अडचणींवर मात करायला आवश्‍यक आहे. प्रशासकीय यंत्रणेची भूमिकाही तेवढीच मोलाची असल्याने प्रभावी अंमलबजावणीसाठी लर्न फ्रॉम होमचे तंत्र आणि मंत्र समजून घेतल्याशिवाय योग्य तो परिणाम साधला जाणे शक्‍य नाही. आणि म्हणूनच अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतही स्वत:ला अपडेट करणे ही आजची गरज आहे. परंपरागत शिक्षण पद्धतीला पर्याय म्हणून लर्न फ्रॉम होमकडे पाहू नका तर एक सहाय्यक साधन म्हणून बघा. कारण मुलांच्या स्क्रीनटाईम दोन तासांच्या वर नको ही काळजीही आपणास घ्यायची आहे. लॉकडाउनसारख्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यापुरते का होईना लर्न फ्रॉम होम गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी हे एकविसाव्या शतकातील आहेत अशावेळेस जर आपण अजूनही विसाव्या शतकातील साधने आणि साहित्य घेऊन या विद्यार्थ्यांपुढे जात असू तर प्रभावी अध्ययन शक्‍य होणार नाही. अशा स्थितीत लर्न फ्रॉम होमचा वापर आणि या संकल्पनेचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT