मुक्तपीठ

मुकी बिचारी...

रेणुका दर्शने

उसाने भरलेल्या बैलगाड्या मागोमाग उभ्या होत्या. रस्ता चढाचा. बैलांच्या पाठीवरचे ओझे पाहून गलबलून आले. चढावर ते ओझे ओढताना त्यांचे पाय तिरपे झाले होते. तोंडातून फेस येत होता. थांबले की पायावर फटकारे. ते गरीब, मुके जनावर वेदनेने पाय एकदम वरती उचले आणि जिवाच्या आकांताने गाडी ओढे. कधी तो कारखाना येणार आणि त्यांची सुटका होणार? परत दुसऱ्या दिवशी तेच कष्ट, त्याच यातना. खरे तर, त्या बैलगाडीतले ओझे ट्रकमध्ये, टॅक्टरवर टाकले तर पंधरावीस मिनिटांत ऊस कारखान्यात जाईल. मग त्या मुक्या जनावरांना का त्रास द्यायचा? मन विषण्ण झाले. संध्याकाळी घरी आलो. गाडीतून प्रवास करूनही, रस्त्याची चाललेली कामे, खड्डे, ऊन, रहदारी यातून दिवसभर झालेल्या प्रवासामुळे शरीर थकले होते. कधी चार घास खाऊन अंथरुणावर पाठ टेकू असे झाले होते. मनात आले, ते ओझी वाहणारे बैल अजूनही जुंपलेलेच असतील. दिवसरात्र हेलपाटे करत राहतील. मार खात राहतील. 

हंगाम संपेपर्यंत हेच घडत राहील. आपण अंग दुखले, डोके दुखले तर वेदनाशामक घेतो. त्या बिचाऱ्यांनी काय करायचे? त्यांचे दुखणे कुणाला कळणार? गूळ, साखर आपण खातो, ही मुकी जनावरे वाळलेला कडबा, उसाचे ताटे खातात आणि आपल्यासाठी राबराब राबतात. कशासाठी माणूस त्यांना एवढे कष्ट व यातना देतो? स्वार्थासाठीच ना? वर्षातून एकदा बैलपोळा साजरा केला की झाले? ‘मानसा मानसा कधी व्हशील रे मानूस?’ आपण यावर काही तोडगा काढू शकतो का? त्या बैलांची यातून सुटका होऊ शकते का? त्या माणसांना कुणी हे समजावून सांगेल का? त्यांना ट्रक, ट्रॅक्टर विनामोबदला पुरवले तर ते त्यातून उसाची वाहतूक करतील का? आपण काही प्रयत्न करू शकू का? मुक्या प्राण्यांना मारहाण करणे हा गुन्हा ठरत नाही का? भूतदयेचे गोडवे गाणारे आपण सर्व इकडे लक्ष का देत नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Election Result: फलटणला रामराजेंचा ‘करेक्‍ट कार्यक्रम’; तीस वर्षांची एकहाती सत्ता उलथवत रणजितसिंह ठरले किंगमेकर!

Transformer Theft: लासगाव येथील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर चोरी

Malkapur Municipal Result: मलकापुरात पहिल्यांदाच कमळ फुलले; मनोहर शिंदेच निर्णायक, नगराध्यक्षपदासह मिळवल्या १९ जागा..

नवऱ्याला ८० हजार पगार, तरीही हुंड्यात मागतोय म्हैस; पत्नी तीन वर्षांपासून माहेरी, पोलिसांत जात नवऱ्याचे काळे कारनामे केले उघड

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; २० प्रभागांसाठी ५८४ मतदान केंद्रांची अधिकृत घोषणा

SCROLL FOR NEXT