muktapeeth 
मुक्तपीठ

हास्य

मीनल धायगुडे

नसण्यातही हसण्याची कला आत्मसात करायला हवी. हसून ताणांना हरवायला हवे.

मी खडकी कँटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरी करते. नोकरीनिमित्त मला रोज स्वारगेट ते खडकी बाजार असा बसचा प्रवास करावा लागतो. अशीच एकदा मी दुपारी बसने घरी जात असता वाटेत बस जरा थांबली होती. माझे लक्ष खिडकीबाहेर गेले आणि एका दृश्‍याने लक्ष वेधून घेतले. पदपथावर एका मजूर कुटुंबाचा संसार मांडलेला होता. त्या कुटुंबातील स्त्री तिच्या छोट्या बाळाला जेवण भरवत होती आणि त्या बाळापेक्षा थोडी मोठी मुलगी आईच्या मागे लपत होती आणि परत चेहरा दाखवत त्या बाळाला खेळवत होती. सुंदर नसूनही मला त्या क्षणी ती खूप सुंदर वाटली. कारण तिचे हास्य आणि मग तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद. त्या दोघांचे असे वेगळेच जग होते. बाकीच्या जगाचा जणू त्यांना विसरच पडला होता. काय होते तिच्याजवळ, ना अंगभर कपडे, ना पोटभर जेवण. पण तिचे आणि तिच्या छकुल्या भावाचे ते सुंदर हास्य कुठल्याच कॅमेऱ्यात टिपता येण्यासारखे नव्हते. एखाद्या लखपतीलासुद्धा इतका आनंदी होता येणार नाही इतकी आनंदी होती ती.

आमची बस निघाली. ते दृश्य अजून नजरेसमोरच असल्यागत. मला वाटून गेले, हा आनंद आजकाल दुर्मीळ होतो आहे का? हसण्यापेक्षा चिंताच जवळच्या झाल्यात का आज बहुतेकांना? जेव्हा भोवती अनेक ताण घेऊन जगणारे चेहरे बघते तेव्हा वाटते, त्यांनी या मुलीची सकारात्मकता घ्यायला हवी. नसण्यातही हसण्याची कला जवळची करायला हवी आणि प्रत्येकाने एकदा तरी असे दिलखुलास हसायला हवे. ज्यात भूतकाळाचे ओझे आणि भविष्याची चिंता वाहून जाईल, विसरून जाईल. माणसांचे अनेक आजार कमी होतील. अशी आनंद देणारी माणसे आणि प्रसंग आपल्याभोवती असतील ती बघायची दृष्टीही आपल्याला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT