muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

वेळ माहात्म्य

सीना सु. गरसोळे

वेळेचे गणित पाळल्यास आपण आयुष्यात निश्‍चितच यशस्वी होतो. वेळेला किंमत देणे अंगीकारले पाहिजे.

आजकाल, आई-वडिलांना, मुलांसाठी आपला मौल्यवान वेळ देण्यासाठी सर्व माध्यमांमधून सांगितले जाते. आपल्या नोकरी-व्यवसायामुळे पालकांना मुलांबरोबर वेळ देता येत नाही. खरंच अत्यंत महत्त्वाची वेळ निघून गेल्यावर पश्‍चात्तापाला अर्थ नाही.

वेळेवर येण्याला-जाण्याला महत्त्व आहे. त्यामुळेच शिस्त अंगी बाणते आणि यशसुद्धा पाठोपाठ येते. निसर्गसुद्धा आपली वेळ पाळतो, ऋतू वेळ पाळतात, त्यांनी ती न पाळल्यास कधी ओला, नाहीतर कोरडा दुष्काळ पडतो.
माणसाने वेळ पाळणे ही प्रकृती व संस्कृती; तर न पाळणे ही विकृती आहे. सर्वांचेच घड्याळ सारखेच असते, पण वेळेचे नियोजन केले, अचानक पुढील अडचणी, अडथळे पाहून कालावधी ठेवून कार्य योजले, तर व्यवस्थितरीत्या पार पडते, नाहीतर वेळेचे गणित कोलमडते. वेळेवर गोष्टी करणारा योजक ठरतो.

मला मरायलासुद्धा वेळ नाही म्हणणारी माणसे आपल्यालाच फसवत असतात. वेळ पाळणे म्हणजे घड्याळाचा गुलाम होणे नाही. परंतु, वेळेशी मैत्री जमली की आयुष्य सुखकर जाते. हल्ली शाळा-कॉलेज, ऑफिसात कर्मचारी आत गेले की सही करतानाच वेळ आपोआप नोंदली जाते. त्यामुळे वेळेवर यावे लागते.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असे आपण म्हणतो. वेळच माणसाला वाचवतो असे म्हटले आहे. हल्ली पुरस्कार दिले जातात ते वेळेवर दिले, मनुष्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर दिले गेले तर कामाला हुरूप, उत्साह येऊन दुपटीने कार्य होते, उलट आयुष्याच्या उतारावर दिले गेले, तर समाधान लाभते; पण वेळ गेलेली असते. आपण वेळ वाचवूया, वेळ चांगल्या गोष्टींना देऊया, दुसऱ्यांकरिता देऊया म्हणजेच सामाजिक कार्यासाठी देऊया. वेळ ही संपत्ती आहे, ती जपून वेळेवर सत्कारणी वैयक्तिक विकास, कुटुंबाच्या प्रगतीसाठी वापरावी. यशासाठी वेळ पाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

SCROLL FOR NEXT