Jaya-Jog
Jaya-Jog 
मुक्तपीठ

आशेच्या हिंदोळ्यावर

जया जोग

गणेशोत्सवात मैत्रिणीशी झालेल्या संवादाने अस्वस्थता आली होती, गणरायांनीच ती दूर केली होती.

मुंबईच्या रौद्रभीषण पावसाची बातमी ऐकून मैत्रिणीला फोन केला. ‘‘मुले बाहेर पडणार होती; पण कंटाळा आला म्हणून घरीच बसली आणि बघता बघता पाऊस वाढला. बाहेर पडलेल्यांचे अतोनात हाल झाले गं!’’ मैत्रिणीचे बोल ऐकून माझा जीव भांड्यात पडला. ‘‘आत्ताची स्थिती मागच्याहून भीषण आहे; पण वाइटात एक चांगले झाले. गणपतीचे सगळे मांडव पाण्यात आहेत. कुठूनही कसलाही आवाज येत नाहीय! सगळीकडे चक्क शांतता आहे.

आजवर कुठल्याही कायद्याला, डेसिबलच्या मर्यादेला, कोर्टाच्या आदेशाला न जुमानणारी ही मस्तवाल मंडळी गपगार पडली आहेत. एका तडाख्यात गणपतीने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे!’’... मैत्रिणीचा संताप तिच्या शब्दाशब्दांतून बाहेर पडत होता. 

मी घरातल्या गणपतीच्या प्रसन्न मुद्रेकडे बघत राहिले. गणराया, काय रे ही वेळ आलीय? भक्तिभावाने तुझे स्वागत करणाऱ्या माझ्या या मैत्रिणीसारख्या असंख्य भक्तांच्या मनात असे विचार यावेत? कर्कश्श आवाजाचा गदारोळ थांबवण्यासाठी तुझे मांडव बुडणे हा एकच पर्याय रहावा? देवा, भक्त उत्साहाने तुझे आदरातिथ्य करतो! पण सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली सुरू झालेला हा असह्य गोंगाट आणि बीभत्स अंगविक्षेप सहन करण्याची शक्ती आता त्या जिवात नाही राहिलेली! माझा उरलेला दिवस असाच विचारांचे काहूर मनात वागवत गेला. संध्याकाळी कोपऱ्यावरच्या सार्वजनिक गणपतीची आरती सुरू झाली. मी बाल्कनीतून बघितले, आमच्या भागातल्या रस्ता झाडणाऱ्या झाडूवालीच्या हातात आरतीचे तबक होते आणि ती तिच्या नवऱ्याबरोबर आरती म्हणत होती. निरंजनाचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हसू जास्तच लोभस करत होता.

आरतीला जाण्यासाठी मी जिना उतरू लागले. शेजारची रश्‍मी घाईघाईने जाताना मला म्हणाली, ‘‘काकू, आता आरतीनंतर अंध शाळेतल्या मुलांचा गाण्याचा कार्यक्रम आहे आणि मी झोपडपट्टीतल्या मुलांचे नाटक बसवलेय, तेही आहे.’’ गणपतीसमोर हात जोडून उभी राहिले. गणपतीची प्रसन्न मुद्रा मला न सांगताच बरंच काही सांगून गेली. आशीर्वाद देणारा गणपतीचा हात मला खूप आश्‍वासक वाटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT