muktapeeth 
मुक्तपीठ

थोडीशी जागा

प्रा. नीला विजय कदम

गाडीतील आपल्या शेजारची थोडीशी जागा देण्यासाठी अंतःकरणात जागा होऊ दे!

कारगिलचे युद्ध संपले होते. प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या जवानांना, अधिकाऱ्यांना आता ओढ लागली होती घराची. सुटी मिळाल्यानंतर मिळेल त्या वाहनाने देशभरातील सैनिक घराकडे निघाले. त्यातीलच सहा जण झेलम एक्‍स्प्रेसने नियमानुसार तिकीट काढून प्रवास करीत होते. आयत्यावेळी रजा मंजूर झाल्याने त्यांच्याकडे आरक्षण नव्हते. त्यांनी रात्र जागून कुठेतरी अवघडत बसत-उठत काढली. अतिशय थकलेले, पण चेहऱ्यावर विजयश्रीचा आनंद अन्‌ कमालीचा अभिमान असणाऱ्या गणवेशधारी जवानातील एकाने पाय पसरून बसलेल्या एका व्यक्तीला विनंती केली, की थोडी बसायला जागा द्याल का? एकाएकी तोफेच्या गोळ्यांप्रमाणे तोंडातून शब्दांची सरबत्ती सुरू झाली. "आम्ही रिझर्व्हेशन केलंय. तुम्हाला इथे मुळीच बसता येणार नाही. बुकिंग करायला काय झालं होतं?' इत्यादी. ""आपण थोडे सरकून बसू या,'' कुणीतरी मोकळ्या स्वरात उद्‌गारले. "सैन्यात आहेत ना, मग उभे राहायची सवय असेलच की!' म्हणत पुन्हा नकारात्मक शब्दांची खैरात. जवानांची पावले पुन्हा टॉयलेटजवळच्या पॅसेजमध्ये. शेजारच्या कंपार्टमेंटमधील लोकांच्या कानावर हे शाब्दिक युद्ध पडलेच होते. तिथले दोघे उठले, म्हणाले, ""आओ भाईजान, आओ! इधर हमारे साथ बैठो। हमे बहोत अच्छा लगेगा।'' त्यांना अक्षरशः हाताला धरून बोलावले. भराभर सर्वांनी पसारा आवरला. त्या सहा जणांना आपलेसे करून घेतले.

एका कंपार्टमेंटमध्ये शास्त्रीय संगीताच्या सुरांमध्ये चिप्स खात पुस्तक वाचणारी सुखासिनता पहुडली होती; तर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये दाटीवाटीने बसलेली आपुलकी लकाकत्या, विस्फारलेल्या नेत्रांनी शौर्याच्या कथा जाणून घेण्यास सरसावली होती. स्वतःच्या अहंकारी संकुचित वृत्तीला कुरवाळणारे कंपार्टमेंट ऐसपैस पसरलेली होती आणि ज्यांनी अविश्रांत धडपडीतून सीमा रक्षणाची धुरा पेलली, हा देश भारतवासीयांसाठी "रिझर्व्ह' ठेवला त्या जवानांकडे ट्रेनचे आरक्षण नसल्याने त्यांना विसाव्यासाठी फूटभर जागा मिळू शकत नव्हती.

सैनिकांना थोडीशी जागा देण्याइतकी त्यांच्या अंतःकरणात जागा होऊ दे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, तुमच्या शहरात काय आहे ताजा भाव? जाणून घ्या

Pune Rain : पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

Explained : बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतातील सामने खेळण्यास नकारच दिला तर काय? त्यांच्या जागी कोणाला संधी मिळेल?

धक्कादायक! धनसंपत्तीच्या हव्यासापोटी चक्क नरबळीचा प्रयत्न; 8 महिन्यांच्या बाळाची थरारक सुटका, सय्यद इम्राननं असं का केलं?

Viral Video : काय म्हणालास रे... ये इकडे तुला...! किरॉन पोलार्डचा पारा चढला, पाकिस्तानी गोलंदाजाला दाखवली त्याची जागा

SCROLL FOR NEXT