मुक्तपीठ

कृष्ण देखिला गं सये! 

अरुणा नगरकर

मागच्या श्रावणातली आठवण. घरासमोर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. तिथेच टपरीमध्ये वॉचमन बायको-मुलासह राहात होता. दीड वर्षांच्या गोपाळला त्याची आई रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात वाळूच्या ढिगाऱ्यावर बसवायची आणि आजूबाजूलाच काम करीत राहायची. त्या दिवशी सकाळी मी चहा घेत गच्चीत बसले होते.

खाली ढिगाऱ्यावर गोपाळ खेळत होता. खेळता खेळता तो ढिगाऱ्यावरून घसरला आणि जमिनीवर आला. मग तो हळूच कसाबसा उभा राहिला, मग डुगूडुगू तोल सावरत, शेजारच्या भिंतीचा आधार घेत नीट उभा राहिला आणि एक पाय पुढे टाकून चालायचा प्रयत्न करू लागला. 

एक-दोन पावले टाकून पडला, पुन्हा उभा राहिला, पुन्हा दोन पावले. तिथेच काम करणारी त्याची आई अतिशय आश्‍चर्याने ते दृश्‍य पाहत होती. तिला तिचे बाळ चालू लागल्याचा अपार आनंद झाला होता. ती धावत गेली आणि पलीकडेच काम करणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली. तोही झटकन आला. आता ते दोघे मुद्दामच आडोशाला, आवाज न करता शांत उभे राहिले. नैसर्गिक ऊर्मीमुळे गोपाळचे प्रयत्न चालूच होते. शेवटी त्याने सलग सहा-सात पावले टाकली, न पडता. 

शेवटी गोपाळच्या आईला राहावले नाही. ती पळत आली. तिने त्याला उचलून घेतले आणि खूप पापे घेतले. गोपाळचे बाबाही खूप खूष झाले. ते दोघे एकमेकांशी त्यांच्या भाषेत काही तरी बोलले. ती पटकन तिच्या टपरीत गेली आणि रुमाल घेऊन बाहेर आली. तिने रुमाल गोपाळच्या डोक्‍याला पट्टीसारखा बांधला. तिथेच आजूबाजूला असलेल्या झाडाचे एक फूल लांब देठ ठेवून तोडून आणले आणि मोरपिसासारखे त्या पट्टीत खोवले.

कौतुक भरल्या नजरेने दोघे जण त्यांच्या गोपाळकृष्णाकडे बघत राहिली, टाळ्या वाजवत राहिली. आता गोपाळही टाळ्या वाजवू लागला. त्यांचा तो आनंदसोहळा मी गच्चीतून बघत होते. कृष्णजन्माष्टमी खरे तर दोन-तीन दिवसांनंतर होती, पण त्या दोघांची गोपाळाष्टमी आधीच सुरू झाली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: मी पोलिसाचा मुलगा, पार्टी करून आलेल्या तरुणांचा नारायण पेठेत धिंगाणा, अपंग व्यक्तीला धडक! रात्री नेमकं काय घडलं?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! मित्रानेच गळा आवळून केला मजुराचा खून; मृतदेह जाळला

Pune Crime : चाकणमध्ये बेकायदा राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई, हद्दपारीची प्रक्रिया सुरू

Pankaja Munde PA case: पंकजा मुंडेंचे PA यांच्या पत्नीचा रहस्यमय मृत्यू; कुटुंबाचा हत्येचा आरोप… नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: : सेव्हनहिल उड्डाणपुलावर भीषण अपघात: अचानक ब्रेकचा बळी ठरला ५ वर्षीय चिमुकला

SCROLL FOR NEXT