suman-navare 
मुक्तपीठ

घन राती हरवले (मुक्‍तपीठ)

सुमन नवरे

मी (वय ७६) व माझे पती (वय ८०) नियमितपणे टेकडीवर फिरावयास जातो. संध्याकाळी जाऊन अंधार पडायच्या आधी परततो. त्या दिवशीही संध्याकाळी नेहमीप्रमाणे वाहनतळावर मोटार ठेवून मारुती देवळाकडे जाणाऱ्या पाऊलवाटेने निघालो. पावसाळ्यामुळे सर्व झाडी हिरवीगार होती. पाऊलवाट बिकट वाटत असूनही आम्ही चालत राहिलो. वीसेक मिनिटे चालल्यावर पाऊलवाट फारच अवघड झाली. रस्ता चुकल्याची जाणीव होऊन आम्ही परतावयाचे ठरवले. परतवाट शोधूनही सापडेना. माझे पाय दुखू लागल्यामुळे यांनी मला एका खडकावर बसायला सांगून ते रस्ता शोधायला गेले. पंधरा-वीस मिनिटांत ते आले नाहीत, म्हणून मीही आपल्या परीने रस्ता शोधण्यास सुरवात केली. दरम्यान, हे परत आले; पण मी दिसत नाही, म्हणून मोठमोठ्याने हाका मारून माझा ठावठिकाणा घेण्याचा प्रयत्न केला; पण बहुतेक चुकामूक झाल्यामुळे मला त्यांच्या हाका ऐकू आल्या नसाव्यात. 

दरम्यान, अंधार पडू लागला होता. आम्ही दोघे ज्या भागात होतो, तेथून शहराचे दिवे, रहदारीचे आवाज ऐकू येत होते; पण एकमेकांशी संपर्क होत नव्हता. हे शेवटी वाहनांच्या आवाजाच्या दिशेने टेकडी उतरू लागले. अंधारात ठेचकळत गवत काट्याकुट्यात धडपडत खरचटत ते टेकडीच्या पायथ्याशी पोचले. आपण कुठे आहोत, याचा त्यांना अंदाज येत नव्हता. समोर एक उंच भित. पलीकडील नुसते आवाज येत होते. भिंतीच्या कडेने चालून पलीकडे जायचा रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला; पण भिंतीची लांबी संपेना. शेवटी मदतीसाठी हेल्प, हेल्प असे मोठ्याने ओरडल्यावर भिंतीवरून एका तरुणाने आवाज दिला. यांनी त्याला आपल्या परिस्थितीची कल्पना देऊन मदतीची याचना केली. त्या तरुणाने हा भाग गोखलेनगर असून पलीकडे जाणे अशक्‍य असल्याचे सांगितले. त्या तरुणाने त्याच्या एका सहकाऱ्याशी बोलून थांबावयास सांगितले. ते दोघे भिंतीवरून उतरून यांच्याजवळ आले. त्या दोघांना टेकडी चढावयाची पाऊलवाट व टेकडीवरील वाहनतळाची जागा माहीत होती. त्यांच्याजवळ टॉर्च असलेले मोबाईलही होते. त्या दोघांनी (मयूर कदम व परख) यांना दोन्ही बाजूंनी आधार देऊन पाऊलवाटेने आमच्या मोटारीजवळ पोचवले. तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते.

दरम्यान, साडेसहापर्यंत नेहमी परतणारे आम्ही साडेसातपर्यंतही आलो नाहीत, म्हणून आमच्या ड्रायव्हरने बाणेरमध्ये राहणाऱ्या आमच्या मुलीला फोन केला. तिने पोलिसांना कळविले व तिच्या ड्रायव्हरला पाठवले. त्या सगळ्यांनी आपल्या परीने रात्रीच्या अंधारात मला साडेआठपर्यंत शोधायचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. साडेआठला हे कोथरूड पोलिस स्टेशनला गेले. काही पोलिस व जवळच्या वस्तीतील पोलिसमित्र अशा आठ-दहा जणांनी शोध सुरू केला. दहा वाजेपर्यंत मुलगी, जावई, आमचे शेजारी आले. त्या सर्वांनी रात्री साडेबारापर्यंत शोधाशोध केली; पण निष्फळ. शेवटी शोध थांबवून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचनंतर थोडे उजाडल्यावर नव्याने शोध घ्यायचे ठरवून सर्व जण परतले. सकाळी परत साडेपाचला हे व जावई टेकडीवर गेले. तेथे जमलेल्या पोलिस व पोलिसमित्रांसह परत शोधमोहीम सुरू केली. सकाळचे आठ वाजले तरी मी त्या कुणाला सापडत नव्हते.  इकडे माझी अवस्था फारच दयनीय झाली होती. अमावस्येच्या अंधारात रस्ता शोधण्याचा मी निष्फळ प्रयत्न केला व शेवटी थकून एका दगडावर बसून राहिले. संध्याकाळी पाच वाजल्यापासून पाण्याचा थेंब वा अन्नाचा कणही घेतला नव्हता. रात्री आठ ते साडेबारा माझ्या नावाने हाका मारणारे इतके लोक शोधत असूनही मला त्यांचे आवाज ऐकू आले नाहीत वा बॅटऱ्यांचे उजेड दिसले नाहीत. मी रात्रभर दगडावर बसून राहिले. सकाळी उजाडल्यावर शहरातील रहदारीचे आवाज ऐकू यावयास लागले. सहाच्या सुमारास सर्व धीर एकवटून आवाजाच्या दिशेने निघाले. चार वेळा पडले, सर्वांगाला खरचटले दुखावले. कसेतरी टेकडीच्या पायथ्याशी सातच्या सुमारास पोचले. चौदा-पंधरा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने अगदी गलितत्राण झाले होते. मला समोर कुंपणाची उंच भिंत दिसत होती. पलीकडे इमारती दिसल्या. पत्रकारनगरापाशी पोचले होते. थोडे चालल्यावर रस्ता दिसला. तेवढ्यात तिथे नवनाथ जाधव आले. मी त्यांना माझी हकिगत सांगून मला घरी जाण्यास मदत करण्यास विनवले. त्या भल्या गृहस्थाने चौकीदाराच्या मदतीने मला भिंतीपलीकडे उतरवून घेतले. माझी अवस्था पाहून दुचाकीवरून मला घरी सोडायची तयारी त्यांनी दाखवली. त्यांनी मला नीट सांभाळून घरी पोचवले. मला सुखरूप बघून शेजाऱ्यांना हायसे झाले. त्यांनी लगेच मी घरी आल्याची खबर मोबाईलवरून कळवली. माझा शोध थांबवण्यात आला. या शोधात किती तरी जणांनी भाग घेतला होता. देवदूतासारखी अनोळखी माणसे मदतीला आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT